वाह क्या बात है! पायलटने प्रवाशाला India vs South Africa मॅचचा स्कोअर अपडेट दिला, पोस्ट व्हायरल
या मॅचमध्ये खूप रोमांचक ट्विस्ट आले होते, अपडेटबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक दिसत होते.
क्रिकेट हा देशातील कोट्यवधी लोकांसाठी एक सण, उत्सव आहे. जेव्हा जेव्हा क्रिकेट मॅच खेळवली जाते, तेव्हा लोक अपडेट्स जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. टी -20 विश्वचषक सुरू आहे आणि अनेक संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी लढत आहेत. ब गटात भारत आणि दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर असून 30 ऑक्टोबरला या दोघांमध्ये सामना झाला होता. या मॅचमध्ये खूप रोमांचक ट्विस्ट आले होते, अपडेटबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक दिसत होते. अशाच एका क्रिकेट चाहत्याने इंडिगो विमानाच्या पायलटकडे स्कोअर अपडेट मागितला, ज्या विमानात तो प्रवास करत होता.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामन्यादरम्यान एका ट्विटर यूजरने रविवारी वैमानिकाने विमानप्रवासादरम्यान पाठवलेल्या नोटेचा फोटो पोस्ट केला.
युझर विक्रम गर्गा यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “भारत आज हरला पण इंडिगो 6ईने माझे मन जिंकले.” त्याचबरोबर सोबतच्या फोटोमध्ये हस्तलिखित स्कोअरकार्ड दिसतंय एसए ३३/०३, ६ ओव्हर्स, आयएनडी १३३/९.
India lost today but @IndiGo6E won my heart. Pilot sent a note mid air when requested for score update.#momentsthatmatter pic.twitter.com/XngFXko63T
— Vikram Garga (@vikramgarga) October 30, 2022
३० ऑक्टोबर रोजी पोस्ट केलेले हे ट्विट ऑनलाइन व्हायरल झाले आणि आता लोक त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे विक्रम गर्गा यांच्या ट्विटवर इंडिगोनेही प्रतिक्रिया दिली.
गर्गा यांच्या या ट्विटला इंडिगोने प्रत्युत्तर देत लिहिले की, “हे पाहून आम्हाला आनंद झाला आहे. आम्हाला तुम्हाला लवकरच पुन्हा एकदा भेटायचे आहे”
इतरांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी स्मायली आणि थंब्स अप इमोजी पोस्ट केले. पर्थमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच विकेट्सनी पराभव केला.