Surprising | जाळं टाकलं माशांसाठी, गळाला लागले चक्क असंख्य आयफोन!

ऍपलचा लोगो बॉक्सवर आहे म्हणजे त्यात आयफोनच असतीलच असं थोडीच आहे? मासेमाऱ्यालाही हेच वाटलं. बॉक्स रिकामेच असतील, असं त्याला वाटलं. पण यावर शिक्कामोर्तब करण्यासाठे ते उघडून बघावे तर लागणारच होते. अखेर बॉक्स उघडलेच!

Surprising | जाळं टाकलं माशांसाठी, गळाला लागले चक्क असंख्य आयफोन!
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 12:20 PM

नशीब एक अशी गोष्ट आहे, जी काही जणांच्या बाबतीच खूपच मॅटर करते. काही जण अवघ्या क्षणात सगळं गमावून बसतात, तर काहीजण रातोरात मालामाल होऊन जातात. कसंबसं घर चालवणाऱ्या एका मासेमाऱ्याच्या बाबतीतही नशीबानं जे दिलं, ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. गोष्ट इंडोनेशियातली (Indonesia) आहे. आयुष्याला वैतागलेल्या एका मासेमार बोट (Fishing Boat) घेऊन मासेमारीसाठी निघाला. खोल समुद्रात गेल्यावर जाळंही टाकलं. पण जाळ्याच जी गोष्ट अडकली, ती कोट्यवधींच्या खजिन्यापेक्षा कमी नव्हती.

नेमकं काय झालं?

इंडोनेशियात एक ठिकाण आहे. नाव आहे बेलितुंग. इथं असलेल्या एका मासेमार होते. गरिबीनं हैराण झालेला. आयुष्याला प्रचंड वैतागलेला. खोल समुद्रात तो नेहमीप्रमाणं मासेमारी करण्यासाठी गेला. समुद्रात माशांना अडवण्यासाठीचा जाळही त्यानं टाकला. काही वेळानं जाळ जड लागल्यानंतर गळाला काहीतरी लागलं, याचा अंदाज घेत मासेमार सतर्क झाला. त्यानंतर जाळ वर ओढायला सुरुवात केली. संपूर्ण जाळ ओढून झाल्यावर त्यानंतर जाळ्यात अडकलेल्या गोष्टीकडं पाहिलं आणि तो चक्रावूनच केला. या मासेमाऱ्याच्या जाळ्यात अनेक बॉक्स अकडले होते. या बॉक्सवर होता ऍपलचा लोगो!

ऍपलचा (Apple) लोगो बॉक्सवर आहे म्हणजे त्यात आयफोनच असतीलच असं थोडीच आहे? मासेमाऱ्यालाही हेच वाटलं. बॉक्स रिकामेच असतील, असं त्याला वाटलं. पण यावर शिक्कामोर्तब करण्यासाठे ते उघडून बघावे तर लागणारच होते. अखेर बॉक्स उघडलेच! बॉक्स उघडल्यानंतर मासेमाऱ्याा आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही. बघतो तर बॉक्सच्या आतमध्ये ऍपलचे वेगवेगळे प्रॉडक्ट होते. आयफोन, आयपॅड आणि मॅकबुक बॉक्समध्ये असल्याचं मासेमाऱ्याच्या लक्षात आलं.

पाण्यात कसं राहिल ऍपल प्रोडक्ट?

आता तुम्हाला वाटेल, पाण्यातून आयफोन (iPhone) कसा काय निघेल? आणि निघाला तरी तो चालू अवस्थेत कसा असेल? प्रश्न रास्तच आहे! जेव्हा या मासेमाऱ्याला ऍपला खजिना हाती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला, तेव्हा असेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांवर मासेमाऱ्यानं जे सांगितलं, ते आणखीनच चक्रावणारं होतं. मासेमाऱ्याच्या जाळ्यात सापडलेले ऍपले बॉक्स इतक्या सराईतपणे बांधले गेले होते की बॉक्सच्या आतमध्ये पाण्याचा एक थेंबही केलेला नव्हता. त्या सर्व बॉक्सला वरुन प्लास्टिकचं कवह देण्यात आलं होतं. त्यामुळे बॉक्सच्या आतमधील ऍपलचे सगळे प्रॉडक्ट्स सुरक्षित होते.

हे असं दुसऱ्यांदा होतंय..

खरंतर या मासेमाऱ्याला ज्या पद्धतीनं ऍपलचा खजिना हाती लागलाय, तशीच आणखी एक घटनाही याआधी घडून गेलेली आहे. घटना आहे अमेरिकेतल्या (America) फ्लॉरिडामधली. तिथं एक माणूस आपल्या मित्रासोबत मौजमजा करायला गेला होता. त्यावेळी त्याला पाण्यात अशीच तरंगणारी काही पॅकेट्स दिसली होती. या पॅकेट्समध्ये तब्बल 30 किलो कोकेन असल्याचं नंतर समोर आलं होतं. ज्याची जागतिक बाजारातली किंमत जवळपास साडे 7 कोटी रुपये इतकी होती.

इतर बातम्या – 

Video : या दिव्यांग व्यक्तीच्या इच्छाशक्तीला जगाचा सलाम, हा व्हायरल व्हिडीओ जिंकेल तुमचंही मन

Video: गोठ्यातील शेणखुर काढण्यासाठी बळीराजाचा भन्नाट जुगाड, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून शेतकऱ्याचं कौतुक!

Internet Wifi | स्टेशनवर आहेच, आता डब्यातही मिळणार! रेल्वेची प्रवाशांना वायफाय खूशखबर

माणूसच नाही, प्राणीही एकमेकांची मदत करतात, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून म्हशीचं कौतुक!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.