फिल्मी स्टाईलने पकडले विद्यार्थी! महिला कॉन्स्टेबल विद्यार्थिनी बनून MBBS कॉलेजमध्ये शिरली आणि…

खांद्यावर बॅकपॅक लटकवून ती रोज क्लासला जायची आणि मैत्रिणींसोबत कॅम्पसमध्ये फिरायची जेणेकरून सगळ्यांना विश्वास बसेल की ती देखील एक विद्यार्थिनी आहे.

फिल्मी स्टाईलने पकडले विद्यार्थी! महिला कॉन्स्टेबल विद्यार्थिनी बनून MBBS कॉलेजमध्ये शिरली आणि...
Government SchemeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 12:35 PM

‘स्त्री काहीही करू शकते’ हे सिद्ध करून दाखवत एका महिला पोलिसाने मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांना अटक केली. 24 वर्षीय महिला कॉन्स्टेबल शालिनी चौहान इंदूरच्या एका कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरणात ‘हिरो’ बनली. तिने आरोपीला पकडण्यासाठी विद्यार्थी असल्याचे भासवून महाविद्यालयात प्रवेश केला आणि त्यानंतर रॅगिंग करणाऱ्या लोकांना पकडले. खांद्यावर बॅकपॅक लटकवून ती रोज क्लासला जायची आणि मैत्रिणींसोबत कॅम्पसमध्ये फिरायची. कॅफेटेरियात ती जेवणही करायची. इतकंच नाही तर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे बंक सुद्धा मारायची जेणेकरून सगळ्यांना विश्वास बसेल की ती देखील एक विद्यार्थिनी आहे.

विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमध्ये गेलेल्या शालिनी चौहान यांचे वास्तव वेगळेच होते. ती एक गुप्त एजंट होती जी कॅम्पसमध्ये रॅगिंग करणाऱ्या लोकांचा शोध घेत होती.

एजंट म्हणून काम करणाऱ्या शालिनीची ओळखणं इतकं सोपं काम नव्हतं. त्यांनी एक-दोन नव्हे तर 11 आरोपींना पकडले.

इंदूरच्या एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये पोलिसांनी रॅगिंगचं प्रकरण उघड केलं होतं. कॉन्स्टेबल शालिनी तीन महिने विद्यार्थिनी म्हणून कॉलेजमध्ये होती. त्यांनंतर तिने खूप हुशारीने आरोपींना पकडले.

female cop to crack ragging case

female cop to crack ragging case

इंदौरच्या संयोगितागंज पोलिस स्टेशन परिसरात कॉलेजमध्ये रॅगिंग करून विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो, अशी तक्रार आली होती. त्यावर पोलिसांनी काही जणांचे पथक तयार करून नंतर कॉन्स्टेबल शालिनीला विद्यार्थी म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला.

शालिनीने हेरगिरी करून आरोपीची ओळख पटवून त्यांची रवानगी तुरुंगात केली. इतकंच नाही तर कॉलेजमध्ये कॅन्टीन स्टाफ म्हणून दोन पोलीस आणि नर्स म्हणून आणखी एका महिला कॉन्स्टेबलला कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं.

या सर्वांनी रॅगिंग प्रकरणातील 11 आरोपींची ओळख पटवली. रॅगिंग करणारे लोक येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना त्रास देत होते. इतकंच नाही तर तो विद्यार्थ्यांना अश्लील काम करण्यास भाग पडत असत.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.