Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केले क्रांतीकारी तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रात कायपालट होणार

anand mahindra: रक्त काढताना वारंवार नस शोधण्याच्या वेदनेवर रामबाण उपाय आहे. हा सर्वात छोटे परंतु महत्वपूर्ण संशोधन आहे. यामुळे आपल्या जीवनातील गुणवत्तेमध्ये उल्लेखनीय बदल होऊ शकतो. आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली.

Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केले क्रांतीकारी तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रात कायपालट होणार
anand mahindra
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 3:48 PM

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सोशल मीडियवर त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या पोस्टची चर्चा होत असते. त्या पोस्ट चांगल्याच व्हायरल देखील होतात. आता आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील अनोखे तंत्रज्ञान दाखवले आहे. आपल्या शरिरातील नस शोधण्यासाठी ‘इन्फ्रारेड रे’चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार रक्त काढण्यासाठी नस शोधण्याच्या वेदनेपासून सुटका होणार आहे. व्हिडिओमध्ये रुग्णाच्या हातावर दबाव पडल्यानंतर नस कशा दिसतात, हे दाखवले आहे.

काय म्हणतात आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, रक्त काढताना वारंवार नस शोधण्याच्या वेदनेवर हा रामबाण उपाय आहे. हे सर्वात छोटा परंतु महत्वपूर्ण संशोधन आहे. यामुळे आपल्या जीवनातील गुणवत्तेमध्ये उल्लेखनीय बदल होऊ शकतो. आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. अनेकांनी ती शेअर केली आहे. हजारो लोकांनी ती पहिली आहे. त्यावर अनेक कॉमेंट आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

काय म्हणतात युजर

आनंद महिंद्रा यांनी केलेल्या या संशोधनाचे कौतूक करत ‘द GiTFD पीएम’ नावाच्या एका युजरने म्हटले आहे की, हे संशोधन मोलाचे आहे. रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठी हे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे अनेक दुर्घटनाही टळू शकता. परिचारिकासंदर्भात नाराजी व्यक्त करत दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नऊ ते दहा वेळा शोधून अनेक परिचारिकांना नस मिळत नाही. त्यामुळे हे संशोधन करण्यात आले आहे.

आणखी एका वापरकर्त्याने या नावीन्यपूर्ण संशोधनाची प्रशंसा केली आहे. त्याने म्हटले की, ‘ही खूप चांगली कल्पना आहे. अनेकांना नस शोधण्यासाठी अनेक वेळा इंजेक्शन टोचले जाते.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.