‘या’ माणसाला पाहुन का पळताहेत लोक? Viral Prank videoवर यूझर्सही संतापले, असं आहे तरी काय यात?
Most dangerous prank videos : सोशल मीडियावर (Social media) एक प्रँक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. पण हे पाहिल्यानंतर बहुतांश यूझर्स संतापले (Angry) आहेत. अशा प्रँक व्हिडिओंवर बंदी घातली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे.
Most dangerous prank videos : सोशल मीडियावर तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रँक व्हिडिओ पाहायला मिळतील. हा असा कंटेंट आहे जो सोशल मीडियावरील लोकांना मोठ्या उत्कटतेने पहायला आवडतो. त्यामुळेच प्रँकशी संबंधित कोणताही व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच तो लगेच व्हायरल होतो. यातील काही धक्कादायक आहेत, तर काही अतिशय भीतीदायक आहेत. सध्या सोशल मीडियावर (Social media) एक प्रँक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल (Viral) होत आहे. पण हे पाहिल्यानंतर बहुतांश यूझर्स संतापले (Angry) आहेत. अशा प्रँक व्हिडिओंवर बंदी घातली पाहिजे, असे लोकांचे म्हणणे आहे. अशी खोड एखाद्याचा जीवही घेऊ शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की पार्किंग एरियामध्ये एक व्यक्ती हातात पाय घेऊन चालताना दिसत आहे. हे पाहून तिथे असलेली एक महिला इतकी घाबरते, की ती काहीही विचार न करता तेथून पळून जाते.
इन्स्टाग्रामवर शेअर
आणखी काही लोकांना घाबरवण्यासाठी ही व्यक्ती लिफ्टमध्ये शिरते. लिफ्टचा दरवाजा उघडताच त्या माणसाला पाहताच दोन मुली घाबरून धावत सुटतात. यानंतर हा व्यक्ती आई आणि मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. पण इथे मुलाला त्या व्यक्तीच्या वागण्याची भीती वाटते. हा प्रँक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर beautifulearth नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, की जरा लोकांच्या प्रतिक्रिया पाहा. एक दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 74 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.
‘तक्रार व्हावी’
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक प्रचंड संतापलेदेखील आहेत. अशा खोड्या करणाऱ्यांविरुद्ध तक्रार व्हायला हवी, असे लोकांचे म्हणणे आहे. एका यूझरचे म्हणणे आहे, की मुलांसोबतचा हा प्रकार कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे मुलांच्या मनात एक भीती बसेल. त्याचवेळी आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले, की मला हे कोणत्याही कोनातून मजेदार वाटले नाही. ही एक अतिशय भयानक प्रँक आहे.
View this post on Instagram