घरभाडे भरून वैतागले, मग या दाम्पत्याने शोधला असा पर्याय… स्वस्त अन् मस्त जीवन

30 वर्षीय काई किन्सले आणि 25 वर्षीय त्यांची पत्नी हेडी इलियट यांनी गेल्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी यापुढे भाड्याच्या घरात न राहण्याचे ठरवले. तसेच स्वत:चे घर न घेता घरभाडे वाचवण्याचा पर्यायावर ते विचार करु लागले.

घरभाडे भरून वैतागले, मग या दाम्पत्याने शोधला असा पर्याय... स्वस्त अन् मस्त जीवन
इंग्लंडमधील काई किन्सले आणि हेडी इलियट
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 3:19 PM

स्वत:च्या मालकीचे घर प्रत्येकाला हवे असते, असे स्वप्न प्रत्येक भारतीयांचे असते. मग घर घेण्यासाठी जुन्या काळातील लोक आपल्या आयुष्यभरातील पुंजी खर्च करतात. त्यानंतर घर न घेऊ शकणारे कायम भाड्याच्या घरातच आपले आयुष्य काढतात. परंतु सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घरभाडे न भरता दाम्पत्याने शोधलेला पर्याय दिसत आहे. हा पर्याय शोधणारे दाम्पत्य आहेत इंग्लंडमधील काई किन्सले आणि हेडी इलियट.

गाडीत केला असा बदल

30 वर्षीय काई किन्सले आणि 25 वर्षीय त्यांची पत्नी हेडी इलियट यांनी गेल्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी यापुढे भाड्याच्या घरात न राहण्याचे ठरवले. तसेच स्वत:चे घर न घेता घरभाडे वाचवण्याचा पर्यायावर ते विचार करु लागले. मग त्यांनी एका व्हॅनला आपले घर बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वत: 2014 मॉडेल प्यूजिओ गाडीमध्ये बदल करण्यास सुरुवात करुन त्याला घरासारखे केले. त्यासाठी त्यांना 4,39,700 रुपये खर्च आला. यापूर्वी ते वर्षाला 4,75,34,647 रुपये घरभाडे देत होते. ते इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स भागात राहतात. त्या ठिकाणी घराभाडे खूप जास्त आहे. त्या तुलनेत व्हॅनच्या पार्किंगसाठी त्यांना महिन्याला केवळ 52 ते 53 हजार रुपये मोजावे लागतात.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kai Kinsey (@campervankai)

फोटोग्राफर पत्नी अन् सुतार पती

किन्सले सुतार काम करतात. तर त्यांची पत्नी हेडी फोटोग्राफर आहे. त्यांनी मिळून त्यांच्या व्हॅनचे सर्व फिटिंग केले. यामुळे त्यांना मजुरीचा खर्चही लागला नाही. या दाम्पत्याचे म्हणणे आहे की, त्यांचे पैसे फ्लॅटमध्ये फक्त 10 तास झोपण्यासाठी कशासाठी गुंतवावे? त्या पेक्षा ते पैसे लक्झरी जीवन जगणे आणि प्रवासावर खर्च करणे अधिक चांगले आहे. विचार करण्याच्या या प्रवृत्तीमुळे आपले शारीरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहत असल्याचे काई किन्सले आणि हेडी इलियट म्हणतात.

View this post on Instagram

A post shared by Kai Kinsey (@campervankai)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

इस्टांग्रामवर campervankai या अकाउंटवरुन या घराचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. ते व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. काही जणांनी त्यांचे कौतूक केले आहे. तर काही जणांनी स्वत: घर ते स्वत:चे घरच असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.