Interesting Facts: प्लास्टिकच्या स्टूलवर छिद्र का असतं? त्यामागचं कारण आहे खूपच खास!
तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर त्यामागचं कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
आपल्या घरात अनेक वस्तू असतात. आपण या वस्तू रोज वापरतो पण या वस्तूंकडे आपण कधी लक्ष देऊन बघत नाही. आपल्याला कधीच प्रश्न पडत नाही की हे असं का आहे? या वस्तूचा आकार, त्याचा मटेरिअल अशा पद्धतीनं का आहे? खरं तर प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. आता बघा ना आपल्या घरात असणारा प्लास्टिक स्टूल! या स्टूल वर एक छिद्र असतं. ते का असतं माहितेय? अहो त्यामागे पण कारण आहे. होय!
तुम्ही कधी विचार केला आहे का की, प्लास्टिकच्या सर्व स्टूलमध्ये छिद्र का असतं? तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर त्यामागचं कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
प्लास्टिक उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये मग ते कारखाने ब्रँडेड असो वा स्थानिक, प्लास्टिक उत्पादनासाठी विज्ञानाचे सामान्य नियम पाळले जातात.
त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात स्टूल जेव्हा बनविले जातात तेव्हा एक मोठे छिद्र तयार केले जाते. आता बघा हे स्टूल प्लास्टिकचे असतात आणि आपल्या घरात, दुकानात हे वापरले जातात.
जागेअभावी हे स्टूल एकावर एक ठेवले जाते. मग अशावेळी या स्टूल ला वेगळे करण्यासाठी खूप शक्ती लावावी लागते. साहजिकच अशा प्रकारे त्यांना वेगळं करणं प्रत्येकाला सोपे जाणार नाही, म्हणून विज्ञानाच्या नियमानुसार स्टूलमध्ये छिद्र पाडले जाते.
जाणून घ्या आणखी काही महत्त्वाची कारणं.
यासोबतच एखाद्या स्टूलवर जास्त वजन असलेली व्यक्ती उभी राहिली तर तो स्टूल तुटू नये म्हणून छिद्रही त्याच्या मागे महत्त्वाची भूमिका बजावते.
त्याचबरोबर यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण आपण असं म्हणू शकतो कि असं केल्यास प्लास्टिकची बचत सुद्धा होते जे की उत्पादनकर्त्यासाठी फायदेशीर आहे. नाही का?
( या लेखात प्रकाशित झालेली माहिती इंटरनेटवरील माहितीवर आधारित आहे, जी मनोरंजनासाठी लिहिण्यात आलीये. आम्ही या गोष्टीला दुजोरा देत नाही.)