IPS शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तीने घेतली भेट, मग जे घडले त्याचा व्हिडिओ व्हायरल

IPS Shivdeep Lande Resign:अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असलेले शिवदीप वामनराव लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. ते अकोला जिल्ह्यात अनेक समाजिक उपक्रम राबवतात. तसेच अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.

IPS शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तीने घेतली भेट, मग जे घडले त्याचा व्हिडिओ व्हायरल
IPS Shivdeep Lande
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 10:06 AM

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील रहिवाशी शिवदीप लांडे बिहारमध्ये आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी नुकताच आपल्या आयपीएस सेवेचा राजीनामा दिला. बिहारमधील सिंघम म्हणून ओळख असलेल्या शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक वृद्ध रडणाऱ्या अवस्थेत त्यांची भेट घेतल्याचे दिसत आहे. दोन तास हे वृद्ध शिवदीप लांडे यांची भेट घेण्यासाठी थांबले होते. त्या भेटीनंतर त्यांना रडू कोसळल्याचे शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हटले शिवदीप लांडे यांनी

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना शिवदीप लांडे यांनी म्हटले आहे की, वृद्ध व्यक्तीला भेटण्याचा तो क्षण खूप भावूक होता. ते खूप भावनाविवश झाले होते. त्याचे हे अश्रू असेच वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. त्याच्या पोस्टला हजारो जणांनी लाईक केले आहे. अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. कॉमेंटमध्येत तर सर्वांनी त्यांना राजीनामा मागे घ्यावा, असा प्रेमाचा आग्रह केला आहे.

शिवदीप लांडे यांचा भावूक संदेश

व्हिडिओसोबत आयपीएस शिवदीप लांडे यांनी भावूक करणारा संदेश लिहिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी राजीनामा दिल्यानंतर अनेक युवक मला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. हजारो जणांचे संदेश मला मिळत आहे. अनेक जण माझ्या सरकारी निवासस्थानाच्या बाहेर येत आहेत. परंतु मी कोणाला भेटू शकत नाही. परंतु त्यांचे हे प्रेम माझ्यापर्यंत पोहचत आहे. एक 80 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती मला भेटण्यासाठी दोन तासांपासून थांबला होता. ते सतत भेटण्याचा आग्रह करत होतो. त्यामुळे मी त्याला भेटलो. त्यावेळी ते आपल्या भावना रोखू शकले नाही. त्यांचे आश्रू असेच वाया जाऊ देणार नाही. माझी जबाबदारी आणखी वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत शिवदीप लांडे

अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असलेले शिवदीप वामनराव लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य शेतकरी वर्गातील आहेत. ते अकोला जिल्ह्यात अनेक समाजिक उपक्रम राबवतात. तसेच अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह चालवणाऱ्या संस्थेला दान करत असतात.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.