बाळ आहे की अल्बर्ट आइन्स्टाइन? याला म्हणतात Problem-Solving Skills
हा गेम खेळायला तुम्हाला खूप डोकं लावावं लागतं. एखाद्या कोड्यासारखा हा गेम आहे. हे कोडे खूप किचकट असते. मग आता जर हा गेम कोड्यासारखा असेल तर विचार करा हे सोडवायला किती वेळ जात असेल आणि किती डोकं लावावं लागत असेल?
मुंबई: इंटरनेटवर असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात. कधी यात कुणी गाणं म्हणतं, कुणी डान्स करतं तर कुणी काहीतरी वेगळंच करत असतं. या व्हायरल व्हिडीओ मध्ये जर सगळ्यात लोकप्रिय कोणते व्हिडीओ असतील तर ते आहेत प्राण्यांचे व्हिडीओ आणि लहान मुलांचे व्हिडीओ. लहान मुलांचे व्हिडीओ तर इतके गोंडस असतात की ते वेगाने व्हायरल सुद्धा होतात आणि शेअर सुद्धा केले जातात. लहान मुलांचे व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिले जातात. प्राणी आणि लहान मूल यांच्या व्हिडीओमध्ये जो निरागसपणा असतो तो कशातच नसतो. आता हा व्हिडीओ बघा, हा व्हिडीओ खूप लोकांना आवडलाय.
तुम्हाला तो गेम माहितेय का?
तुम्हाला तो गेम माहितेय का ज्या गेम मध्ये एक-एक रंग एका बाजूला करायचे असतात? हा गेम खेळायला खूप डोकं लागतं. तो क्यूब सुद्धा माहित असेल तुम्हाला ज्यात एका बाजूला एकच रंग सेट करायचा असतो. या गेमचे तर अक्षरशः क्लासेस सुद्धा घेतले जायचे. हा गेम खेळायला तुम्हाला खूप डोकं लावावं लागतं. एखाद्या कोड्यासारखा हा गेम आहे. हे कोडे खूप किचकट असते. मग आता जर हा गेम कोड्यासारखा असेल तर विचार करा हे सोडवायला किती वेळ जात असेल आणि किती डोकं लावावं लागत असेल?
Einstein Babypic.twitter.com/uWUcSSTWBT
— Figen (@TheFigen_) October 9, 2023
टास्क चुटकीसरशी पूर्ण
मग अशा पद्धतीचा गेम एखादं लहानसं बाळ खेळू शकतं का? तुमचं उत्तर “नाही” असंच असेल. लहान म्हणजे किती लहान? एखाद्या वर्षाचं बाळ? अहो हा व्हिडीओ बघा, तुम्हाला जे अशक्य वाटतंय ते या लहानशा बाळाने शक्य करून दाखवलंय. हे बाळ इतकं गोड आहे. या बाळाकडे बघून कुणी कल्पना सुद्धा करू शकत नाही की इवलुसं हे बाळ रंगांचा गेम खेळेल. व्हिडीओच्या सुरुवातीला तिथे सगळ्या रंगाचे गोल एकत्र असलेले दिसतात. टास्क असा आहे की सगळे रंग वेगवेगळे करायचे आहेत. हे छोटं बाळ हा टास्क चुटकीसरशी पूर्ण करतं. व्हिडीओ खूप मजेदार आणि गोड आहे.