भारताच्या Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंग नंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया!
बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे विक्रम लँडर उतरवून भारताने इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग इतके सोपे नव्हते. त्यामुळे देशभरात प्रार्थना सुरू होत्या. संपूर्ण जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मोहिमेकडे खिळल्या होत्या.
मुंबई: भारताच्या प्रत्येक कामगिरीवर पाकिस्तानात नेहमीच एक अशी व्यक्ती असते जी आपल्याच देशावर हास्यास्पद टिप्पणी केल्यामुळे व्हायरल होते. 2019 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर आपल्या मजेशीर कमेंटमुळे व्हायरल झालेला मोमीन शाकिब तुम्हाला आठवत असेल. यावेळी चांद्रयान 3 वर भारताच्या मोठ्या यशावर प्रतिक्रिया देताना एका पाकिस्तानी व्यक्तीने असे काही म्हटले ज्यामुळे सोशल मीडियावर तो व्हिडीओ व्हायरल झालाय.
“आम्ही चंद्रावरच राहतो”
पाकिस्तानी युट्यूबर सोहेब चौधरी याने जेव्हा या व्यक्तीला चांद्रयान-३ बद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो हसत हसत आपल्याच देशातील त्रुटी सांगायला लागला आणि पाकिस्तानचीच खिल्ली उडवू लागला. तो माणूस म्हणाला, “आम्ही चंद्रावरच राहतो.” यावर युट्युबर आश्चर्याने विचारतो, कसे? तो माणूस उत्तर देतो – तिथे वीज आणि पाणी नाही, इथे पण (पाकिस्तान) नाही. तिथे गॅस नाही, इथेही (पाकिस्तानात) नाही. तिथे वीज नाही, इथे तर तुम्ही बघतच आहात इथेही नाहीये वीज. हा व्हिडीओ बघताना तुम्ही खूप हसाल. या व्यक्तीची चांद्रयानावर काय प्रतिक्रिया आहे ते पाहूया.
Meanwhile, the Sense of Humor of Pakistani People are always top class. This on Chandrayaan pic.twitter.com/Y127YPeyIv
— Joy (@Joydas) August 23, 2023
सोशल मीडियावर व्हायरल
आता या पाकिस्तानी व्यक्तीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जॉय नावाच्या एका युजरने @Joydas ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “पाकिस्तानी लोकांचा सेन्स ऑफ ह्यूमर नेहमीच टॉप क्लास असते.