घराची किंमत केवळ 85! कुठे? वाचा सविस्तर…
जगभरातील अनेक देशांमध्ये घरांच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे निम्म्या किमतीतही फ्लॅट आणि घरे विकण्यास तयार आहेत. आज आम्ही तुम्हाला केवळ 85 रूपयात मिळणाऱ्या घराबद्दल सांगणार आहोत.
मुंबई : स्वत: चं घर खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण ते खिश्याला परवडणारं नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास होतो. आपल्या बजेटमध्ये घर मिळावं अशी अनेकांची इच्छा असते. असंच तुमच्या खिश्यात मावणारं घर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोरोना महामारीमुळे (Corona) अनेक देशांचं अर्थचक्र बिघडलं. जगभरात हजारो आणि लाखो लोक बेरोजगार झाले. अनेकांना आर्थिक आणि शारिरिकदृष्ट्या त्रास सहन करावा लागला. या सगळ्याचा घरांच्या किमतींवर परिणाम झाला. केवळ मोठ्या शहरांमध्येच नाही तर छोट्या शहरांमध्येही मालमत्तेच्या किमती कमी झाल्या आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये घरांच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे निम्म्या किमतीतही फ्लॅट (Flat) आणि घरे (Home) विकण्यास तयार आहेत. आज आम्ही तुम्हाला केवळ 85 रूपयात मिळणाऱ्या घराबद्दल सांगणार आहोत.
केवळ 85 रूपयांचं घर
काही देशांमध्ये स्थानिक प्रशासनाने काही अटींसह जुनी घरे एक डॉलर किंवा एक युरोमध्ये विकण्याची योजना सुरू आहे. ‘द मिरर’च्या बातमीनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने इटलीतील सिसिली येथील मुसोमेली येथे फक्त एक युरो म्हणजे भारतीय रूपयात केवळ 85 रुपये मध्ये एक छोटेसे घर विकत घेतलं आहे. हे घर खरेदी करण्यासाठी झुंबड लागली होती. त्यात या ऑस्ट्रेलियन व्यक्तीचा नंबर लागला.
डॅनी मॅककबिनने सिसिलीच्या कॅल्टॅनिसेटा प्रांतात असलेल्या मुसोमेली गावात घर विकत घेतले. मुसोमेलीची स्थापना 14 व्या शतकात मॅनफ्रेडो तिसरा चियारामोंटे याने ‘मॅनफ्रेडी’ नावावरून केली असल्याचा दावा केला जातो. सध्या या ठिकाणी परदेशी लोकांना स्थायिक करण्यासाठी ‘केस 1 युरो’ प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पांतर्गत मॅकक्यूबिनने येथे एक युरो म्हणजेच 85 रुपये किमतीला हे घर विकत घेतले आहे.
मॅककबिन इटलीमध्ये घर घेण्यापूर्वी 17 वर्षे ब्रिटनमध्ये राहत होता. विशेष म्हणजे, घर खरेदी केल्यानंतर एक वर्ष उलटले तरी त्याला नूतनीकरणासाठी मजूर मिळू शकलेला नाही. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून इटलीला संपूर्ण देशात मजुरांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी, मॅककबिनला मालमत्ता विकावी लागली. घराचे नूतनीकरण करण्यासाठी बिल्डर सापडत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या