Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उणे 30 अंश तापमानात ITBP Commandantचे न थकता पुशअप्स, पाहा Viral video

ITBP Commandant Ratan Singh Sonal video : ITBP जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 55 वर्षीय कमांडंट रतन लाल सिंग सोनल यांनी लडाखमध्ये (Ladakh) 17,500 उंचीवर उणे 30 अंश तापमानात (Temperature) 65 पुशअप्स (Pushups) केले आहेत.

उणे 30 अंश तापमानात ITBP Commandantचे न थकता पुशअप्स, पाहा Viral video
उणे तीस अंश तापमानात पुशअप्स करताना आयटीबीपी जवान
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 11:05 AM

ITBP Commandant Ratan Singh Sonal video : देशसेवेत अर्पण भारतीय लष्करातील जवानांचे धाडस पाहून प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून येते. कारण सीमेवर कितीही कठीण परिस्थिती असली, तरी देशवासीयांच्या शांततेसाठी हे जवान सीमेवर सदैव तत्पर असतात. सध्या एका ITBP जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 55 वर्षीय कमांडंट रतन लाल सिंग सोनल यांनी लडाखमध्ये (Ladakh) 17,500 उंचीवर उणे 30 अंश तापमानात (Temperature) 65 पुशअप्स (Pushups) करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही भारतमातेच्या या शूर सुपुत्रांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखता येत नाही, याचाही हा व्हिडिओ पुरावा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, ITBP कमांडंट रतन लाल सिंह लडाखमधील बर्फाळ शिखरावर पुशअप्स करताना दिसत आहेत. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 17 हजार 500 फूट उंचीवर आहे. त्याच वेळी, येथे तापमान उणे 30 अंश आहे.

अभिमानाने फुलली छाती

कमांडंटचे अशा परिस्थितीतले धाडस आणि उत्साह पाहून भारतीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. प्रत्येकजण त्यांना सलाम करत आहे. इंडो-तिबेट बॉर्डर कर्मचाऱ्यांचे फोटो समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सैनिकांच्या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ITBP जवान बर्फाळ भागात आणि उणे 25 अंश तापमानात उभे राहून सराव करताना दिसत होते. हवामानामुळे न घाबरता, ITBP जवान गोळीबार करताना आणि सहनशक्तीचा सराव करताना दिसला.

सशस्त्र पोलीस दलांपैकी

ITBP हे देशातील 5 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. भारत-चीन युद्धादरम्यान ऑक्टोबर 1962मध्ये ITBPची स्थापना झाली. ITBP लडाखमधील काराकोरम खिंडीपासून अरुणाचल प्रदेशातील जचेप लापर्यंत चीनला लागून असलेल्या भारताच्या सीमेच्या 3,488 किमी लांबीचे रक्षण करते.

आणखी वाचा :

Kabristan wala restaurant : भारतातलं एक अजब रेस्टॉरंट, कुठे आहे? काय खास? पाहा ‘हा’ Viral video

‘या’ माणसाला पाहुन का पळताहेत लोक? Viral Prank videoवर यूझर्सही संतापले, असं आहे तरी काय यात?

Bengal viral video : विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या शिक्षिकेला दिला अनोखा निरोप, तुम्हालाही येईल लहानपणीची आठवण!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.