#Himveers : रक्षणासाठी कटिबद्ध म्हणत ITBPनं Share केला हिम बिबट्याचा Video
Snow leopard video : पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ (Video) मजेशीर असतात. ते पाहून आपल्याला हसायला येतं. तर दुसरीकडे जंगली (Wild) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ पाहणं हे एक धाडसच आहे. असाच एक जंगली प्राणी आहे बिबट्या. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Snow leopard video : सोशल मीडियावर एकापेक्षा एक असे सरस व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हायरल व्हिडिओ अनेक प्रकारचे असू शकतात. प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ तर सर्वात जास्त अपलोड होत असतात. त्यात पाळीव प्राण्यांचे आणि जंगली प्राण्यांचे असे प्रकार पाहायला मिळतात. पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ (Video) मजेशीर असतात. ते पाहून आपल्याला हसायला येतं. तर दुसरीकडे जंगली (Wild) प्राण्यांचे (Animals) व्हिडिओ पाहणं हे एक धाडसच आहे. असाच एक जंगली प्राणी आहे बिबट्या. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तर त्याच्या जोडीला भारतीय सैन्यदेखील या व्हिडिओत दिसतंय. सैन्याच्या अनेक धाडसी कार्यांचे व्हिडिओ आपण व्हायरल झालेले पाहतो, आता हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका बिबट्याला वाचवण्यासाठी आयटीबीटी जवानांनी आपला जीव पणाला लावल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सुरक्षेची जबाबदारी
हिमाचल प्रदेशातील काझा, स्पिती खोऱ्याजवळ 12,500 फूट उंचीवर ITBPच्या जवानांना पूर्ण वाढ झालेला हिम बिबट्या दिसला. आपले जवान देशाच्या रक्षणासाठी कसे तत्पर असतात, तेच या व्हिडिओतून सिद्ध होत असल्याचे दिसते. माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी सैनिकांनी आपल्या खांद्यांवर घेतली आहे. आता हा व्हिडिओ पाहून तुमचा सैन्याबद्दलचा आदर आणखी वाढेल.
Rare sight of a rare species:
A fully grown Snow Leopard was seen in Spiti Valley in Himachal Pradesh at 12,500 feet.
ITBP is committed to preserve and restore flora and fauna in the Himalayan region#Himveers pic.twitter.com/TEX7ov2nuR
— ITBP (@ITBP_official) March 7, 2022
आयटीबीपीची तत्परता
ITBT कर्मचारी कशी मदत करत आहेत, हे व्हिडिओमध्ये पाहता येईल. प्राण्यांच्या मदतीसाठी आयटीबीपी किंवा वन विभागाचे अधिकारी हजर असतात. ITBTच्या ट्विटरवर हा एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये हिम बिबट्या दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूझर्स यावर कमेंट्स करत आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ शेअरही करत आहेत. अनेकांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. हा एक दुर्मीळ प्राणी झाल्याचं यूझर्सनी म्हटलं आहे.