कडक उन्हात एक ग्लास थंड पाणी ‘अमृत’पेक्षा कमी नाही. लोक पाणी विकत घेऊन आणि मागून पिऊ शकतात. मात्र काँक्रीटच्या वाढत्या जंगलामुळे बेघर प्राण्यांना पाण्याची मोठी टंचाई भासू लागलीये. काही चांगले लोकं प्राण्यांसाठी मातीच्या भांड्यात पाणी ठेवतात. अनेकदा आपल्याला पक्ष्यांसाठीसुद्धा पाणी ठेवलेलं दिसून येतं.तरीही काही प्राणी आहेतच की असे जे माणसांना घाबरतात, माणसं ज्यांना घाबरतात. अशांनी काय करायचं? कुठे जायचं? सध्या सोशल मीडियावर (Social Media) याच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. खरं तर किंग कोब्रा (King Cobra) आहे. या सापाला खूप तहान लागलीये. पण ही तहान भागणार कशी, या व्हिडिओत तो किंग कोब्रा चक्क प्लॅस्टिकच्या बाटलीने पाणी पितोय. एका माणसाने या तहानलेल्या सापाला प्लॅस्टिकच्या बॉटलने पाणी पाजलेलं दिसून येतंय.
हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दयाळू आणि सौजन्याने वागा, आमचीही पाळी येवो!” या क्लिपला 68 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 4 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. किंग कोब्रा हा सापाच्या सर्वात धोकादायक आणि विषारी प्रजातींपैकी एक मानला जातो, ज्याच्यासमोर माणसाला अक्षरशः पळून जाणे फार कठीण होते.
Be kind & humble,
tables will turn? pic.twitter.com/L2m0U99s8y— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 15, 2022
हा व्हिडिओ 58 सेकंदाचा आहे. यात आपण पाहू शकतो की, एक महाकाय किंग कोब्रा जमिनीवर आहे, ज्याला माणसाने शेपटीने पकडले आहे. तर समोर उभा असलेला वन्यरक्षक स्नेक कॅचरच्या मदतीने कोब्राच्या डोक्यावर नियंत्रण ठेवतो आणि हाताने पाणी पिऊन त्याची तहान भागवितो. आश्चर्यकारक गोष्ट घडते जेव्हा कोब्रा, हल्ला करण्याऐवजी शांतपणे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिऊ लागतो. यावर शेकडो युझर्स प्रतिक्रिया देत आहेत. या कोब्राची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले गेले असते, अशी आशा असल्याचे काहींनी लिहिले आहे. त्याचबरोबर काही युझर्सनी लिहिलं की, हे घातक ठरू शकतं, ते किंग कोब्राच्या अगदी जवळ होते. त्याचबरोबर अनेक युझर्स या अधिकाऱ्यांना सलाम करत हे अतिशय सुखद दृश्य असल्याचं म्हटलं आहे. तहानलेल्यांना पाणी पाजणेही चांगले आहे.