Video | बिबट्याची थेट पाण्यात उडी, एका सेकंदात मगरीची शिकार, पाहा थरारक व्हिडीओ

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने थेट मगरीची शिकार केली आहे. (jaguar hunt crocodile video)

Video | बिबट्याची थेट पाण्यात उडी, एका सेकंदात मगरीची शिकार, पाहा थरारक व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 3:58 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ शेअर केला जातात. यापैकी काही व्हिडीओ हे प्राणी आणि पक्ष्यांचे असतात. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ पाहण्यास नेटकऱ्यांना विशेष आवडते. त्यातही शिकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर कमी वेळात लवकर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने थेट मगरीची शिकार केली आहे. (Jaguar hunt Crocodile catches her with jump video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

असं म्हटलं जातं की, पाण्यामध्ये फक्त मगरीचं राज्य चालतं. पाण्यामध्ये असल्यानंतर तिच्या वाटेला कोणी जात नाही. एवढंच नाही तर हरिण, कुत्रे तसेच माकड यासारखे प्राणी भीतीपोटी मगरीपासून दोन हात दूर राहतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने मगरीला आपल्या जबड्यामध्ये पकडून पाण्याबाहेर फरफटत नेलं आहे. बिबट्याच्या या धाडसामुळे सगळे अवाक् झाले आहेत.

बिबट्याने शिकार कशी केली ?

बिबट्याने पाण्यातील मगरीची अतिशय चलाखीने शिकार केली आहे. या शिकारीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तसे स्पष्ट होते. व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे पाण्यामध्ये एक मगर दिसते आहे. ही मगर पाण्यामध्ये बिनधास्त विहार करतेय. मात्र, याच वेळी पाण्याच्या बाहेर वर असलेल्या झाडांमध्ये बिबट्या या मगरीची शिकार करण्यासाठी बसला आहे. आपल्या वर झाडांमध्ये बिबट्या बसला आहे, याची मगरीला कल्पनासुद्धा नाही. याच वेळी योग्य संधी साधून बिबट्याने थेट पाण्यात उडी घेत मगरीवर हल्ला केला आहे. या बिबट्याने मगरीला एका सेकंदात आपल्या कणखर जबड्यात पकडलं आहे. तसेच पुढल्याच क्षणी हा बिबट्या पकडलेल्या मगरीला फरफटत पाण्याच्या बाहेर काढताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबद्दल नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, African animals या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. बिबट्याचे धाडस आणि त्याने केलेली शिकार यामुळे नेटकरी अंतर्मुख झाले आहेत. अनेक लोक या व्हिडीओला आपल्या अकाऊंटवर शेअर करत आहेत. तसेच काहीजण मजेदार कमेंट्ससुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO | लॉकडाऊनमध्ये फिरताना पोलिसांनी हटकलं, पठ्ठ्या म्हणतो, माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय

Viral Video : भर मंडपात नवरीने डोळे मिचकावले, केला ‘असा’ इशारा की सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

गळ्यात वरमाला टाकली अन् बायकोचे थेट पाय धरले, नवरदेवाने असं का केलं ?, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

(Jaguar hunt Crocodile catches her with jump video goes viral on social media)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.