Nap Boxes By Japan: जगाचं काय तर जपानचं काय! कर्मचाऱ्यांना झोपण्यासाठी नॅप बॉक्सेसची निर्मिती! खास पॉवर नॅप साठी स्टॅंडिंग स्लीप पॉड्स
Power Nap In Office: टोकियोमध्ये असणाऱ्या फर्निचर सप्लायर इटोकीच्या ऑफिसने दिवसा पॉवर नॅप घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक उपाय सुचवला. जपानमध्ये बऱ्याच तास कार्यालयात काम करणे ही एक मोठी समस्या आहे म्हणून या कंपन्यांना या समस्येवर तोडगा काढायचा आहे.
Nap Boxes By Japanese Company: झोप येते का तुम्हाला ऑफिसमध्ये? येतंच असेल. दुपारच्या ब्रेकमध्ये (Lunch Break) जेवल्यानंतर जी काय डुलकी लागते (Power Nap) पण तरीही कर्मचाऱ्यांना झोपता येत नाही ही समस्या फार मोठी आहे. हे जपान सारख्या देशाला आधी कळलंय. जपान आपल्या अनोख्या तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो आणि आता हा देश जगापुढे स्टॅंडिंग स्लीप पॉड्स (Standing Sleeping Pods) सादर करण्यास तयार आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांना पॉवर नॅप मिळू शकेल. टोकियोमध्ये असणाऱ्या फर्निचर सप्लायर इटोकीच्या ऑफिसने दिवसा पॉवर नॅप घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक उपाय सुचवला. जपानमध्ये बऱ्याच तास कार्यालयात काम करणे ही एक मोठी समस्या आहे म्हणून या कंपन्यांना या समस्येवर तोडगा काढायचा आहे.
झोपायला पुरेसे आरामदायक
फर्निचर सप्लायर इटोकीच्या कम्युनिकेशन्सचे संचालक साको कावाशिमा यांनी माध्यमांना सांगितले की, “जपानमध्ये असे बरेच लोक आहेत जे स्वत:ला काही काळ बाथरूममध्ये बंद करतात, जे मला योग्य वाटत नाही. आरामशीर ठिकाणी झोपणे चांगले.” वॉटर हीटरसारखे दिसणारे हे उपकरण डोके, गुडघे आणि पाठीला चांगले आरामदायक वाटेल याची खात्री करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे, जेणेकरून लोकांना झोपायला पुरेसे आरामदायक वाटेल, पडण्याची चिंता न करता. डिझायनर्सना आशा आहे की ,’नॅप बॉक्स’ जपानच्या ऑफिस संस्कृतीत योगदान देणारं करेल.”
30 मिनिटांपर्यंत डुलकी मारण्याची परवानगी
“मला वाटते की बरेच जपानी लोक कोणताही ब्रेक न घेता सतत काम करतात. आम्हाला आशा आहे की कंपन्या आराम करण्यासाठी अधिक लवचिक मार्गाने याचा वापर करू शकतील.” कर्मचाऱ्यांना जास्त तास काम करण्यास मदत करण्यासाठी जगभरातील बऱ्याच कंपन्या नवीन कल्पना आणत आहेत.
Official Announcement ? #sleep #powernap #afternoonnap pic.twitter.com/9rOiyL3B3S
— Wakefit Solutions (@WakefitCo) May 5, 2022
बेंगळुरू स्थित ‘वेकफिट’ ही स्टार्ट-अप आपल्या नव्या ‘नॅप टू नॅप’ धोरणांतर्गत आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावर झोपण्याची परवानगी देत आहे. मे महिन्यात कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत ई-मेलनुसार, वेकफिटचे सहसंस्थापक चैतन्य रामलिंगगौडा यांनी जाहीर केले की, कर्मचारी सदस्यांना आता कामावर 30 मिनिटांपर्यंत डुलकी मारण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यांनी आपल्या मेलमध्ये म्हटले आहे की, “संशोधनातून असे दिसून आले आहे की दुपारच्या झोपेमुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, सर्जनशीलता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते. नासाच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की 26 मिनिटांच्या पॉवर डुलॅपमुळे कार्यक्षमता 33% वाढू शकते.