साऊथच्या सुपरहिट गाण्यावर जपानी महिलेचा डान्स! Viral Video
व्हायरल क्लिपमध्ये मेयो नावाची जपानी महिला तिची दक्षिण भारतीय मैत्रीण रीनासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये या महिला 2004 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट 'घिली'मधील 'अपडी पोडे' या सुपरहिट गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसत आहेत.
मुंबई: सोशल मीडियावर एका जपानी महिलेने साडीतील डान्स मूव्ह्स दाखवत नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. व्हायरल क्लिपमध्ये मेयो नावाची जपानी महिला तिची दक्षिण भारतीय मैत्रीण रीनासोबत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये या महिला 2004 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘घिली’मधील ‘अपडी पोडे’ या सुपरहिट गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन्ही महिला कमालीच्या एनर्जीने डान्स करत आहेत. लाल आणि निळ्या रंगाच्या साडीत मेयो खूपच सुंदर दिसत आहे. तर तिची मैत्रीण रीना तिला साऊथ इंडियन स्टाईलमध्ये साथ देत आहे. मेयोकडे पाहिल्यावर ती दुसऱ्या देशाची आहे असं तुम्हाला वाटणार नाही. त्यांची भाषा वेगळी असली तरी या गाण्याने दोन देशांची मने जोडली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल.
मायोने @mayojapana आपल्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘माझी मैत्रीण रीनाला लहानपणापासून हे गाणे आवडते. तिच्यासोबत साडीत नाचताना खूप मजा आली. हा व्हिडिओ जवळपास 9 हजार लोकांनी लाइक केला आहे, तर कमेंट सेक्शनमध्ये भारतीयांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
एक यूजरने कमेंट करते हुए लिखा, मेयो जी… तुम्ही इथे आमच्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी व्हा. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तर आणखी एका युजरने लिहिलं आहे की, “वाह तुम्ही सुपरच्या वर डान्स केला आहे.” आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘तुम्हा दोघांची एनर्जी पाहण्यासारखी आहे.