अवघ्या 83 रुपयात हॉटेल बुक, कसं शक्य आहे?; हॉटेल मालकाची अट काय?

तुम्ही अनेक ठिकाणी फिरायला जाता. तिथे राहता. फिरायला जाताना कमीत कमी खर्च कसा होईल यावर तुमचा भर असतो. तसेच चांगली सुविधा कशी मिळेल यावरही तुम्ही भर देता. तसेच एखादं हॉटेल बघताना स्वस्त आणि सुरक्षित असं हॉटेल बघता. कधी कधी तर पैसे गेले तरी चालतील पण सुरक्षित हॉटेल मिळतं का? यावरही तुमचा भर असतो. पण तुम्हाला एखादं हॉटेल स्वस्तात मिळालं अन् त्यासाठी एखादी अट असेल तर...?

अवघ्या 83 रुपयात हॉटेल बुक, कसं शक्य आहे?; हॉटेल मालकाची अट काय?
japanese hotelImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 8:25 PM

नवी दिल्ली | 14 फेब्रुवारी 2024 : साधारणपणे सर्वात स्वस्त हॉटेलचा रुम फक्त 700-800 रुपयात मिळतो. हे सर्वांना माहीत आहे. पण एक असंही हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या रूमची किंमत फक्त एक डॉलर म्हणजे 83 रूपये आहे. अवघ्या 83 रूपयात या हॉटेलचा रूम मिळतो. तो खिशाला परवडणाराही आहे. पण एक अट आहे. ती अट तुम्ही ऐकली तर थक्क व्हाल. तुमचंही डोकं गरगरल्या शिवाय राहणार नाही. अशी काय आहे अट? त्या अटीमुळेच एवढ्या कमी किमतीत रूम मिळतोय का? चला तर जाणून घेऊया.

ही हॉटेल जपानच्या फुकोका येथे आहे. तुम्ही या हॉटेलात 100 येन देऊन राहू शकता. 100 येनची किमत ही एक डॉलर एवढी आहे. रुपयात मोजायचं झालं तर 83 रुपये. तुम्ही विचारात पडला असाल की एवढ्या स्वस्तात हॉटेलचा रुम कसा काय मिळतोय? हॉटेल मालकाला कसा फायदा होत असेल? एवढ्या कमी किमतीत रूम दिल्यानंतर हॉटेलचा खर्च कसा निघत असेल? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे प्रश्न मनात निर्माण होणं चांगलंही आहे. मात्र, एवढा स्वस्त रूम कोणत्याही अटीशिवाय मिळणार नाही हे ही तितकंच खरं आहे. या हॉटेल मालकानेही तेच केलंय. त्याने हा रुम स्वस्तात दिलाय. पण देताना एक अट घातली. ही अट घातल्यानेच हॉटेलची कमाई वाढली आहे.

अटक काय?

हॉटेल मालकाची अट अत्यंत अतरंगी आहे. ग्राहकाला जितके दिवस स्वस्तात राहायचं त्यांनी तितके दिवस खुशाल राहावं. पण इथे राहत असताना त्याने चेक इन करण्यापासून चेक आऊट करण्यापर्यंतचं वास्तव्य लाइव्ह करायचं आहे. म्हणजे ग्राहकाला त्याचा संपूर्ण स्टे लाइव्ह स्ट्रीम करायचा आहे. ज्याला हे मंजूर असेल त्यालाच 83 रुपयात हॉटेलचा रूम दिला जात आहे. ही अट अनेकांना धक्का देणारी आहे. पण अनेक लोक हसत हसत ही अट मान्य करतानाही दिसत आहे.

नवं बिझनेस मॉडेल

हॉटेलने ग्राहकांना त्यांचं संपूर्ण स्टे लाइव्ह करायला सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक रुममध्ये असंख्य कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे आत रुममध्ये काय चाललंय हे बाहेरच्या लोकांना स्पष्टपणे पाहता येत आहे. जे लोक या हॉटेलची लाइव्ह स्ट्रीम पाहत आहे, त्यांच्याकडून हॉटेल पैसे घेते. यातून हॉटेलची किती कमाई होते हे स्पष्ट झालेलं नाही. पण असाही रयोकन नावाचं हे हॉटेल अनेक वर्षांपासून याच सिद्धांतावर काम करत आहे. फुकोकामध्ये हॉटेल रुम महागात मिळतात असंही नाही. एखाद्या हॉटेलातील साधा रुमही दोन ते तीन हजारात सहज मिळतो. पण हे हॉटेल अल्ट्रा चीप आहे. तसेच लाइव्ह स्ट्रीम हे त्यांनी कमाईचं बिझनेस मॉडेल बनवलं आहे.

फक्त रुमची स्ट्रिमिंग

हॉटेलात राहायला आलेल्या व्यक्तीला केवळ लाइव्ह स्ट्रिमिंगची परवानगी द्यावी लागते. बाथरूम वेगळा आहे, त्यामुळे तिथपर्यंत कॅमेरा पोहोचतच नाही. त्याशिवाय तुम्हाला लाइट्स बंद करण्याचीही परवानगी असते. ही लाइव्ह स्ट्रिमिंग केवळ व्हिडीओची असते. ऑडिओ नसतो. म्हणजेच तुम्ही रुममध्ये काही संवाद साधत असाल तर तो लोकांना ऐकायला येणार नाही. मात्र, तुम्ही रुममध्ये काय करत आहात हे सर्व लोकांना पाहता येतं. जपानचं फुकोका शहर अत्यंत सुंदर आहे. उद्याने, मंदिर, संग्रहालये आणि तीर्थस्थळांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.

Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.