Music Video Oye Hoye Hoye | जस्सी गिल आणि धनश्रीच्या ‘ओए होये होये’ गाण्याची सोशल मीडियावर धूम
नुकताच जस्सीचा नवीन म्युझिक व्हिडीओ ‘ओए होये होये’ प्रदर्शित झाला (Music Video Oye Hoye Hoye).

मुंबई : हिट सॉग्स देणारा पंजाबी गायक जस्सी गिलचा (Jassie Gill) चाहत्यांमध्ये मोठा क्रेझ आहे (Music Video Oye Hoye Hoye ). त्यामुळे त्याच्या प्रत्येक गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. नुकताच जस्सीचा नवीन म्युझिक व्हिडीओ ‘ओए होये होये’ प्रदर्शित झाला. जस्सीच्या इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यानेही धुमाकूळ घातला आहे. यामध्ये जस्सीसोबत प्रसिद्ध युट्यूबर, डान्सर आणि क्रिकेटर चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) देखील दिसत आहे. या दोघांचं हे डेडली कॉम्बिनेशन चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे (Jassie Gill And Dhanashree Vermas New Music Video Oye Hoye Hoye Is In Trending).
हे गाणं एक डान्स नंबर आहे. हा म्युझिक व्हिडीओ 12 मार्चला प्रदर्शित झाला. धनश्री वर्माच्या डांन्सचे लोक दिवाने आहेत. अशात जस्सीसोबत तिचं कॉम्बिनेशन लोकांना पसंतीस पडत आहे.
म्युझिक व्हिडीओ ‘ओये होए होये’हा भूषण कुमार यांच्या कंपनी टी-सीरीजने बनवलं आहे. हे गाणं हॅप्पी रायकोटीने लिहिलं आहे. तर अरविंद खैराने याचं दिग्दर्शन केलं आहे. ओये होए गाण्याला एका भल्यामोठ्या सेटव शूट करण्यात आलं आहे. त्यामुळे देखील हे मोठ्या प्रमाणात हिट झालं आहे. .
पाहा व्हिडीओ –
धनश्रीने या म्युझिक व्हिडीओबाबतच एक पोस्टरही आपल्या सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. यामध्ये तिने गाण्याची रिलीज डेटचा खुलासा केला होता. युट्यूबवर हे गाणं प्रदर्शित होताच 24 तासात या व्हिडीओला 6.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Jassie Gill And Dhanashree Vermas New Music Video Oye Hoye Hoye Is In Trending
संबंधित बातम्या :
Goat Selfie Viral Video | बकरीला सेल्फी नाही रुचली, थेट शिंगेच तरुणीला टोचली
VIDEO : ना हेल्मेट, ना तोंडावर मास्क, नियमांची ऐशीतैशी, तरुणीची बाईकवर हात सोडून स्टंटबाजी