#HelpChain : मदत ‘अशी’ही, Viral video पाहून तुम्हीही म्हणाल, माणुसकी अजून जिवंत!

Humanity with heart : माणुसकी असणे सर्वात महत्त्वाचे आहे. याच्याशीच संबंधित एक मजेदार व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह... याला म्हणतात मदत'. दीनदुबळ्यांना मदत (Help) करते तीच व्यक्ती म्हणवली जाते.

#HelpChain : मदत 'अशी'ही, Viral video पाहून तुम्हीही म्हणाल, माणुसकी अजून जिवंत!
जेसीबीचालकानं दुचाकीस्वाराला पावसात भिजण्यापासून वाचवलंImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 6:06 PM

Humanity with heart : माणूस म्हणवून घेणेच केवळ पुरेसे नाही तर माणसाने माणूस म्हणून जगले पाहिजे आणि त्यासाठी माणुसकी असणे सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला उपयोगी पडते, त्यांना मदत करते, गरीब आणि दीनदुबळ्यांना मदत (Help) करते आणि जो दुसर्‍याचे दुःख आणि वेदना समजते, तेव्हाच ती व्यक्ती म्हणवली जाते. मात्र, आजच्या धावपळीच्या जगात माणुसकी फार कमी लोकांमध्ये दिसून येते. लोक आपल्या व्यवसाय-धंद्यात किंवा कामात व्यस्त झाले आहेत. कोणाला काही त्रास झाला, तर त्याच्याकडे माणूस म्हणून पाहायला, त्याला मदत करायला कोणालाही वेळ नाही. परंतु जगात असे काही लोक आहेत जे नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. याच्याशीच संबंधित एक मजेदार व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल ‘वाह… याला म्हणतात मदत’.

दुचाकीस्वाराला कशी केली मदत?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे दुचाकीस्वारासह काही वाहने रस्त्यावर अडकली आहेत. आता तुम्ही विचार करत असाल, की दुचाकीस्वार पावसात भिजला असेल, पण नाही. दुचाकीस्वार पावसात भिजला नाही आणि त्याचे कारण म्हणजे एका जेसीबीचालक व्यक्तीने त्याला भिजण्यापासून वाचवत मदत केली. जेसीबीच्या माणसाने दुचाकीस्वाराला कशी मदत केली आणि पावसात भिजण्यापासून कसे वाचवले हे व्हिडिओ पाहून तुम्हाला चांगले समजेल. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुमचे मनोरंजन तर होईलच मात्र त्याचबरोबर तुम्हाला त्यात माणुसकीही पाहायला मिळेल.

ट्विटर हँडलवर शेअर

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे, की इच्छा असेल तर प्रत्येकजण कोणालातरी मदत करण्यासाठी काहीतरी करू शकतो…’ 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 11 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

‘गियर निसटला तर..’

व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, की दैवी दृश्य आहे, पण समस्या अशी आहे, की जेसीबी व्यक्तीच्या हातातून गियर निसटला तर या व्यक्तीचे काय होईल’, तर दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की ‘मानवता जिवंत आहे’.

आणखी वाचा :

…अन् CISF जवानानं ‘असा’ वाचवला चिमुरडीचा जीव! लोक म्हणतायत, हेच खरे ‘हिरो’; Metro video viral

विनाशकारी युद्धादरम्यान Viral झाला युक्रेनियन महिलेचा ‘हा’ Video, काय सांगतेय ती? ऐका

Bride groom : वधूसोबतचा ‘हा’ गोड क्षण वरानं केला कॅमेऱ्यात कैद, Video viral

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.