रांची: लग्नातले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरीचा डान्स, कधी नवरदेवाचा डान्स कधी त्यांच्या मित्र मैत्रिणींचा डान्स तर कधी त्यांच्या आई वडिलांचा डान्स. मुळात लग्न म्हणजे एक मोठा सोहळाच असतो भारतात. यावेळी लोकं मनापासून एन्जॉय करतात. अजून एक गोष्ट असते जी खूप व्हायरल होते. कोणती? नवरीबाईंची एंट्री! होय. नवरी लग्नमंडपात कशी येते हे सुद्धा व्हायरल होत असतं. कधी नवरी स्वतः गाडी चालवत येते, कधी घोड्यावर बसून येते तर कधी नाचत येते. जशी मुलगी शिकली तशी यातही प्रगती होत गेली, मुलीची लग्नातली एंट्री पण बदलत गेली. आता हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघा. या नवरीमुळे जेसीबी पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या नवरीबाईंनी चक्क जेसीबी वर बसून लग्नात एंट्री घेतलीय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ रांचीचा आहे. जिथे कृष्णा महतो नावाचा एक व्यक्ती फुलांनी सजवलेल्या जेसीबीमध्ये आपल्या वधूला घेऊन जाताना दिसत आहे. असे सांगितले जात आहे की कृष्णा फुलांच्या सजावटीचे काम करतो आणि त्याने आपले लग्न वेगळे आणि लक्षात राहण्यासाठी हे केले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेसीबीवर जाड गाद्या ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यावर कृष्णा आणि त्याची बायको दोघेही बसलेले दिसत आहेत.
? जे बात ?
रांची में दुल्हनिया को लेने JCB से पंहुचा दूल्हा।दुल्हन की JCB से विदाई का वीडियो।#Ranchi #Jharkhand pic.twitter.com/IXP06OnJmP— साइको किलर? (@Killer_007_A) June 14, 2023
@Killer_007_A नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. एका यूजरने लिहिलं , ‘वाह!’ आणखी एका युजरने लिहिले की, “आपल्या वधूला अशा प्रकारे घेऊन कोण जातं भाऊ?” याआधीही अनेक प्रकारचे व्हिडिओ आले आहेत.