सनकी प्रेयसीने ‘किलर सूप’ देऊन काटा काढला, चव चाखताच एक्स बॉयफ्रेंडसह पाचजण गतप्राण

नायजेरियातील एडो येथे एका तरुणीने तिच्या माजी प्रियकराचा बदला घेण्यासाठी सूपात विष मिसळून पाच जणांचा खून केला. तिने पारंपारिक मिरचीच्या सुपात विष टाकून एक्स-बॉयफ्रेंडला आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर चार लोकांना ते पाजले. या तरुणीला अटक करण्यात आली असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत. वडिलांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी एक्स-बॉयफ्रेंडच्या नवीन गर्लफ्रेंडशी वाद झाल्यानंतर तिने हे कृत्य केले.

सनकी प्रेयसीने 'किलर सूप' देऊन काटा काढला, चव चाखताच एक्स बॉयफ्रेंडसह पाचजण गतप्राण
Nigeria poison soup deathsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 4:30 PM

एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने सूपमध्ये विष कालवनू त्याला दिलं. हे सूप प्यायल्याने बॉयफ्रेंडसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या एडो येथील ही घटना आहे. पाच जणांना विष देऊन मारून टाकणाऱ्या या तरुणीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

सूड भावनेतून या मुलीने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणीने असं काही षडयंत्र रचलं की ते ऐकून सर्वांनाच धक्का बसेल. एका वृत्तानुसार एकाच कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह बंद खोलीत आढळले. कुटुंबातील लोक बाहेर गेले होते. जेव्हा ते घरी आले तेव्हा घरात कोणीच दिसलं नाही. त्यांनी अधिक शोधाशोध केली तेव्हा एकदोन नव्हे पाच मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. हे दृश्य पाहून कुटुंबातील इतर सदस्यांनी हंबरडाच फोडला.

बदला घेण्याच्या नादात

पाच लोकांनी विषारी सूप घेऊन आपले प्राण गमावले आहेत. हे हत्याकांड एका तरुणीने घडवून आणलं आहे. आपल्या आधीच्या प्रियकराचा बदला तिला घ्यायचा होता. तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पारंपारिक मिरचीच्या सुपात विष टाकलं आणि सर्वांचा काटा काढला. विशेष म्हणजे या तरुणीने नकळतपणे चार लोकांचा जीव घेतला. तिला तिच्या बॉयफ्रेंडला सूप द्यायचं होतं. पण त्याच्यासोबत चार लोकं आली. त्यामुळे विष कालवलेलं सूप सर्वांना द्यावं लागलं.

कारणांचा शोध घेतोय

स्थानिक पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. मृत्यू कसा झाला हे समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही. जेवणातून विष देण्यात आलं असावं किंवा जनरेटरमधून निघणाऱ्या धुरामुळेही या पाच जणांचा मृत्यू झाला असावा, असं एडो स्टेट पोलीस कमांडचे प्रवक्ते मुसा यामू यांनी सांगितलं.

वडिलांनी काय सांगितलं?

या 17 वर्षाच्या मुलीने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. घटना घडली तेव्हा मी गावात नव्हते. पाच लोकांचा मृत्यू जनरेटरच्या धुरामुळे झाला आहे, असं तिचं म्हणणं आहे. दरम्यान, या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा या मुलीवर संशय बळावला. काही दिवसांपूर्वी मुलाची नवीन गर्ल फ्रेंड आणि या मुलीची गाठ पडली होती. तेव्हा या मुलीने नवीन गर्ल फ्रेंडचे कपडे फाडले होते. तिच्याशी झगडा केला होता. त्यामुळे या हत्याकांडाच्या घटनेत या मुलीचा हात असण्याची शक्यता आहे, असं त्या मुलाच्या वडिलाचं म्हणणं आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....