Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावात निघाली अनोखी अंत्ययात्रा, सगळ्या महिला सहभागी झाल्या, एकही पुरुष नव्हता, कारण…

कालचिती पंचायतमधील रामचंद्रपूर गावात राहणाऱ्या 40 वर्षीय जुंआ सबर यांचा मृत्यू झाला. हे गाव घाटशिला पोलीस ठाण्यातंर्गत येतं. जुंआ सबर यांच्या अंत्ययात्रेमध्ये गावातील सगळ्या महिला सहभागी झाल्या होत्या. एकही पुरुष त्यामध्ये नव्हता.

या गावात निघाली अनोखी अंत्ययात्रा, सगळ्या महिला सहभागी झाल्या, एकही पुरुष नव्हता, कारण...
Village Image Credit source: AI Genreated Image
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 9:59 AM

झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यात एक हैराण करणारं प्रकरण समोर आलय. या जिल्ह्यातील एका गावात फक्त एकच पुरुष रहात होता. आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी गावातील महिलांनीच एकत्र येऊन त्याची तिरडी बांधली. मयत व्यक्तीच्या मुलींनी त्याला खांदा दिला. पत्नी अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेली. सर्व महिलांनी मिळून त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. या गावातील सगळे पुरुष मजुरीसाठी केरळ आणि तामिळनाडूमध्ये वास्तव्याला असतात. फार कमी वेळा ते गावी येतात.

कालचिती पंचायतमधील रामचंद्रपूर गावात राहणाऱ्या 40 वर्षीय जुंआ सबर यांचा मृत्यू झाला. हे गाव घाटशिला पोलीस ठाण्यातंर्गत येतं. गावात राहणारा तो एकमेव पुरुष होता. गावातील महिलांनी मिळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. हे गाव खूप मागासलेलं असून इथे राहणारे लोक मोठ्या प्रमाणात मजुरीवर अवलंबून आहेत. गावात सबर जातीचे लोक राहतात. या गावची लोकसंख्या कमी होत आहे. त्यांची हालत खूप खराब आहे. लोक विस्थापितांच जीवन जगत आहेत. जुंआ सबरच्या मृत्यूमुळे नातेवाईकासह संपूर्ण गाव शोकमग्न आहे.

गावात किती लोक राहतात?

मीडिया रिपोर्टनुसार, रामचंद्रपूर गाव जंगलामध्ये आहे. इथे सबर जातीची 28 घरं आहेत. यात 80 ते 85 लोक राहतात. गावातील जवळपास 20 पुरुष मजुरीसाठी दुसऱ्या राज्यात राहतात. या गावात जुंआ सबर हा एकमेव पुरुष राहत होता. काही दिवसांपूर्वी तो आजारी पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. गावात एकही पुरुष नव्हता. म्हणून महिलांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. महिलांनी त्याची तिरडी बांधली व अंत्ययात्रा काढली.

दोन लग्न झालेली

मृत जुंआ सबरची दोन लग्न झाली होती. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्याच्या मुलींनी अंत्ययात्रेत वडिलांना खांदा दिला. दुसरी पत्नी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. मुलींनी अन्य महिलांच्या मदतीने खड्ड खोदून त्यात मृतदेहाच दफन केलं. मृत जुंआ सबर यांचा 17 वर्षांचा मुलगा तामिळनाडूमध्ये मजुरी करतो.

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.
पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले..
पुणे अत्याचार प्रकरणात एकनाथ शिंदेंची मोठी माहिती, म्हणाले...
स्वारगेट प्रकरणातील आरोपीनं माजी आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्वारगेट प्रकरणातील आरोपीनं माजी आमदाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही
मराठी भाषेची दैना थांबेना! एमए-मराठी करणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ नाही.
स्वारगेटमध्ये बलात्कार, आता 30 हजारांची चोरी, थेट कंडक्टरचे पैसे लंपास
स्वारगेटमध्ये बलात्कार, आता 30 हजारांची चोरी, थेट कंडक्टरचे पैसे लंपास.
पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या मागावर; मंत्री योगेश कदम यांची माहिती
पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या मागावर; मंत्री योगेश कदम यांची माहिती.
पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, थेट...
पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, थेट....
कॅब चालकाने केले अश्लील चाळे, तरुणीने चालत्या कॅबमधून घेतली उडी ..
कॅब चालकाने केले अश्लील चाळे, तरुणीने चालत्या कॅबमधून घेतली उडी ...
लग्नाच्या वरातीत महिलांचा अश्लील डान्स, लग्न राहिलं बाजूला भलतंच घडलं
लग्नाच्या वरातीत महिलांचा अश्लील डान्स, लग्न राहिलं बाजूला भलतंच घडलं.