राम मंदिरासाठी 30 वर्षांपासून या महिलेची कठोर प्रतिज्ञा; सोशल मीडियावर का होतायत ट्रेंड?

अयोध्येत राम मंदिर बनावं अशी असंख्य लोकांची इच्छा होती. ही इच्छा अखेर येत्या 22 जानेवारी रोजी पूर्ण होणार आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या मंदिरासाठी गेल्या 30 वर्षांपासून एका महिलेनं कठोर प्रतिज्ञा केली आहे. सरस्वती देवी असं त्यांचं नाव आहे.

राम मंदिरासाठी 30 वर्षांपासून या महिलेची कठोर प्रतिज्ञा; सोशल मीडियावर का होतायत ट्रेंड?
सरस्वती देवीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 10:48 AM

झारखंड : 11 जानेवारी 2024 | झारखंडमधील 85 वर्षीय या वृद्ध महिलेनं 6 डिसेंबर 1992 रोजी एक निर्धार केला होता. अयोध्योतील बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याठिकाणी राम मंदिर बांधून होईपर्यंत मौन व्रत पाळण्याचा निर्धार त्यांनी केला होता. अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत असून तब्बल 30 वर्षांनंतर त्या पहिल्यांदाच बोलणार आहेत. सरस्वती देवी असं त्यांचं नाव असून अयोध्येत त्या ‘मौनी माता’ म्हणूनच ओळखल्या जातात. ज्यादिवशी राम मंदिरचं उद्धाटन होईल, त्याच दिवशी मौन व्रत तोडणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. येत्या 22 जानेवारी रोजी मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सरस्वती देवी अखेर आपलं मौन व्रत तोडणार आहेत. त्यांची ही कहाणी सोशल मीडियाद्वारे अनेकांपर्यंत पोहोचली असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सरस्वती देवी यांची कथा काय?

सरस्वती देवी या धनबाद इथल्या राहणाऱ्या आहेत. गेल्या तीस वर्षांपासून त्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत फक्त इशाऱ्यांतच बोलत आहेत. 2020 पर्यंत त्या रोज संध्याकाळी फक्त एक तास बोलायच्या. मात्र ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन केलं, त्या दिवसापासून त्यांनी पूर्ण वेळ मौन व्रत ठेवलं आहे. “6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर अयोध्येत राम मंदिर होईपर्यंत मौन व्रतचं पालन करणार असल्याचा निर्धार माझ्या आईने केला होता. राम मंदिराच्या अभिषेकाची तारीख जाहीर झाल्यापासून ती खूप आनंदात आहे”, अशी प्रतिक्रिया सरस्वती देवी यांच्या मुलाने दिली.

सरस्वती देवी या सोमवारी रात्रीच अयोध्येसाठी रवाना झाल्या आहेत. 22 जानेवारी रोजी त्या मौन व्रत तोडणार आहेत. राम मंदिराच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महंत नृत्य गोपाल दास यांनी सरस्वती देवी यांना खास आमंत्रण दिलं आहे. सरस्वती देवी यांना आठ मुलं आहेत. 1986 मध्ये पती देवकीनंदन अगरवाल यांच्या निधनानंतर त्यांनी आपलं आयुष्य रामभक्तीत व्यतीत करण्याचं ठरवलं आहे. तेव्हापासून त्या देवभक्तीत अधिकाधिक वेळ घालवतात, असं त्यांच्या मुलाने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

गेल्या तीस वर्षांपासून सरस्वती देवी या त्यांच्या कुटुंबीयांसोबत फक्त इशाऱ्यांमध्येच बोलत आहेत. काही अवघड वाक्ये असल्यास त्या एका कागदावर लिहून सांगतात. 2001 मध्ये त्यांनी मध्य प्रदेशातील चित्रकूट याठिकाणी सात महिन्यांपर्यंत तपस्याही केली होती. आजही त्या रोज पहाटे 4 वाजता उठवतात आणि सहा ते सात तास ध्यानधारणा करतात. संध्याकाळच्या आरतीनंतर त्या रामायण आणि भगवदगीता यांसारखी अध्यात्मिक पुस्तके वाचतात.

सरस्वती देवी यांचा रोजचा आहारसुद्धा मर्यादित असतो. त्या दिवसभरातून फक्त एकच वेळ जेवतात. सकाळी आणि संध्याकाळी त्या फक्त एक ग्लास दूध पितात. त्यांच्या जेवणातही डाळ, भात, चपाती अशा शाकाहारी पदार्थांचाच समावेश असतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.