Video: जुते दो, पैसे लो म्हणत, मेव्हणीची दाजींकडे चक्क 21 लाखांची मागणी, पाहा लग्नातील भन्नाट किस्सा

जरी भारतात लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा असल्या, तरी बूट चोरुन त्या बदल्यात पैसे मागण्याची प्रथा सगळीकडेच पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये साली बुटाच्या बदल्यात चक्क 21 लाखांची मागणी करते.

Video: जुते दो, पैसे लो म्हणत, मेव्हणीची दाजींकडे चक्क 21 लाखांची मागणी, पाहा लग्नातील भन्नाट किस्सा
साली बुटाच्या बदल्यात चक्क 21 लाखांची मागणी करते.
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 4:46 PM

सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यात सर्वात जास्त व्हिडीओ असतात ते जीजा आणि सालीचे. म्हणजेच मेव्हणी आणि दाजींचे. लग्नात बूट चोरणं आणि त्याबदल्यात पैसे मागणं हे नवीन नाही. जरी भारतात लग्नाच्या वेगवेगळ्या परंपरा असल्या, तरी बूट चोरुन त्या बदल्यात पैसे मागण्याची प्रथा सगळीकडेच पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये साली बुटाच्या बदल्यात चक्क 21 लाखांची मागणी करते. (jija sali news saali demands of 21 lakh for Shoe jijajis mother in law says shocking words)

व्हायरल होणारा हा व्हिडीओ लग्नातील व्हिडीओ शुटींगमधला आहे. यामध्ये बूट चोरण्यापासून ते पैसे मागण्यापर्यंतचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. दाजींचे बूट चोरण्यासाठी मेव्हणीला बरीच मेहनत करावी लागते, आधी हा बूट चोरण्यासाठी डोकं लावावं लागतं, कसाबसा बुट हाती लागतो, पण नवऱ्याकडेचे मेव्हणीला पकडतात, आणि मग बूट ओढण्यासाठी झटापट सुरु होते. त्यात नवऱ्याकडच्या सोबत बाचाबाचीही होते. बराच वेळ शूज पकडून ठेवल्यानंतर अखेर मेव्हणीला हा शूज मिळाला.

मग येते ती वेळ, जेव्हा बुटांच्या बदल्यात पैशांची मागणी करायची असते. त्यावेळी मेव्हणी शूज देण्यासाठी तब्बल 21 लाख रुपयांची मागणी करते. त्यानंतर नवऱ्याकडचे बाचाबाची करायला लागता. नवऱ्याची बहिण बोलते, “कुठलेही पैसे न घेता इतका सुंदर मुलगा तुम्हाला मिळाला आणि बुटांचे 21 लाख रुपये?” या गोष्टीवर बराच वेळ वाद सुरु राहतो. तेवढ्यात नवऱ्याकडचे नोटांची गड्डी मेव्हणीला देतात, हे किती पैसे आहेत हे कळत नाही, पण हजारो रुपये असतील. पैसे मिळाल्यानंतर मेव्हणी खूश होते, आणि शूज परत करते.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. The Wedding Corp नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ आम्हाला कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

हेही पाहा:

Video: लग्नात शूज सांभाळायला भावाला बसवलं, पण मेव्हणीच्या चलाखीपुढे सगळं फेल, पाहा व्हिडीओ

Video: भन्नाट कॉमेडी करणाऱ्या राजपाल यादव यांचा भन्नाट डान्स, लग्नातील डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल

 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.