टेक ऑफ करताना विमानाचं चाकच गळून पडलं… हो! खरं!! बघा व्हिडीओ

नुकताच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका विमानाचं चाक अचानक गळून पडलं.

टेक ऑफ करताना विमानाचं चाकच गळून पडलं... हो! खरं!! बघा व्हिडीओ
Aircraft loses landing gearImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 4:03 PM

हा व्हिडीओ बघा, विमानाने टेक ऑफ केलं आणि आकाशात गेल्यावर त्याचं चाकच खाली गळून पडलं. असं झालं तर किती भीती वाटत असेल ना? मग त्या विमानानं लँडिंग कसं केलं असेल? विमान अपघाताचे व्हिडिओ जगभरातून रोज समोर येतात. नुकताच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका विमानाचं चाक अचानक गळून पडलं. हे सर्व घडलं जेव्हा विमानानं उड्डाण केलं आणि त्याचे एक चाक तुटलं. या दरम्यान त्यात आगही दिसून आली.

वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार ही घटना इटलीतील टरांटो विमानतळावर घडलीये. ॲटलास एअरचे ड्रीमलिफ्टर बोईंग 747 हे विमान उड्डाण करणार होते. त्याने उड्डाण करताच टायर काढताच त्याचे मुख्य लँडिंग गिअर विमानापासून वेगळे झाले.

कदाचित विमानात बसलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत लगेच माहिती नव्हती, पण नंतर त्यांना याबाबत सांगण्यात आलं. हे विमान इतर चाकांच्या मदतीने अमेरिकेत उतरलं त्यामुळे आधी लोकांमध्ये भीती निर्माण झाली.

बोईंगने एका निवेदनात म्हटले आहे की, कार्गो विमानाचे अमेरिकेतील चार्ल्सटन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले आहे.

सध्या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्याचे चाक पडताच आग लागल्याचेही दिसून आले, असंही सांगण्यात येतंय.

रिपोर्ट्सनुसार, विमानापासून वेगळे झालेल्या टायरचे वजन सुमारे 100 किलो आहे. विमानतळाजवळील द्राक्षाच्या शेतात हा टायर आढळून आला. या अपघाताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये विमानानं उड्डाण करताच त्यापासून वेगळं झाल्यानंतर एक टायर धावपट्टीवर पडताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये विमानातून धूरही बाहेर पडताना दिसतोय.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.