Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्चा बदामच्या Reelनं फेमस झाली अंजली अरोरा! तिचा नवा Reel आलाय, पाहून म्हणाल, ‘आ रा रा रा….’

Anjali Arora : 'कच्चा बदाम' फेम रीलमध्ये अंजलीनं घाललेल्या नाईट ड्रेसमध्येच आता तिचं आणखी एक रील अपलोड केलं आहे. हे रील पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय.

कच्चा बदामच्या Reelनं फेमस झाली अंजली अरोरा! तिचा नवा Reel आलाय, पाहून म्हणाल, 'आ रा रा रा....'
इन्टाग्राम रील्स फेम अंजली अरोराचा नवा व्हिडीओ पाहिलात का?
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 6:34 PM

कच्चा बदाम गाणं फेमस (Trending song Kacha Badam) झालेलं आहेच. हे गाणं गाणाऱ्यालाही लोकांनी फेमस करुन टाकलं. भुबन बड्याकर (Bhuvan Badyakar) असं हे गाणं गाणाऱ्याचं नाव. या गाण्याची गोष्ट तर तुम्हाला आम्ही याआधीच सांगितली आहे. घराघरातल्या बायका, पोरींना या गाण्याची वेड लागण्याचा किस्साही फार इंटरेस्टिंग आहेच. तो तुम्हाला इथे वाचायला मिळेल. पण भुबन बड्याकर सोबतच आणखी एका सुंदर तरुणीला या गाण्यानं फेसम केलं. या तरुणीचं नाव आहे, अंजली अरोरा (Anjali Arora). अनेकांनी हिचे रील्स आपल्या फेसबुक, इन्टाग्राम, व्हॉट्सअप किंवा युट्युबवर पाहिलेले असतीलच. अल्पावधित असंख्य लोकांच्या मोबाईल गॅलरीत जिनं इन्ट्री केली, ती ही अंजली अरोरा! या अंजली अरोराची चर्चा सध्या सगळीकडे आहेच. ती कोण आहे? कुठली आहे? ती काय करते? तिचं वय किती? असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांच्या भाऊगर्दीचं अंजलीचं आणखी एक रील तिनं नुकतंच पोस्ट केलं आहे.

‘कच्चा बदाम’ फेम रीलमध्ये अंजलीनं घाललेल्या नाईट ड्रेसमध्येच आता तिचं आणखी एक रील अपलोड झालंय. हे रील पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. चला तर आधी तिचं हे रील पाहून घ्या.. आणि मग अंजली अरोरा बद्दलही जाणून घ्या..

जुन्या कपड्यांमधलं नवं कोरं रील –

अंजलीचं हे रील आतापर्यंत एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून हजारो लोकांनी हे रील लाईक केलंय. एकापेक्षा एक भारी कमेंड या रील्सवर वाचायला मिळाल्यात.

अंजली अरोरा हे इन्स्टाग्रामवरचं गेल्या अनेक दिवसांतलं ट्रेन्डिंग नाव आहे. anjimaxuofficially या नावाननं अंजली अरोराचं अधिकृत वेरीफाईड अकाऊंट इन्स्टाग्रामवर आहे. जवळपास 11 मिलियन लोकं तिला इन्टाग्रामवर फॉलो करतात. अगदी खरी संख्या सांगायची, तर 10.8 इतके तिचे फॉलोअर्स इन्स्टाग्रावर आहेत. मूळची नवी दिल्ली राहणारी अंजली एक अभिनेत्री आहे, असं तिनं आपल्या बायोमध्ये लिहिलंय. इन्स्टाग्रावर प्रचंड एक्टीव्ह असणाऱ्या या अंजलीनं आपल्या रील्सनं तरुणांना कमालीचं आकर्षित केलंय.

पाहा आणखी एक रील –

अंजली अरोरानं केलेलं कच्चा बदामवरचं रील चांगलंच गाजलं होतं. तिनं कच्चा बदामवर एक नव्हे तर दोन रील्स केले होते. यातलं लाल रंगाच्या नाईट ड्रेसमध्ये तिनं केलेलं रील हे जास्त व्हायरल झालं होतं.

नाईट ड्रेसमधलं रिल –

कच्चा बदामचं आणखी एक हटके परफॉरमन्स

अंजलीचं महिन्याभरापूर्वी एक युट्युब गाणंही रिलीज झालं आहे. यात तिनं अभिनय केला असून ती एका म्युझिक अल्बमचा भाग होती. एका हरियाणवी गाण्यात तिनं भूमिका केली होती. हे गाणंही प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

संबंधित बातम्या :

घराघरातल्या बायका, पोरींना ज्या गाण्यानं देशभर वेड लावलं ते कच्चा बादामची गोष्ट तुम्हाला माहितीय?

राणू मंडल यांनी सुरात गाण्याचा प्रयत्न केला Kacha Badam; पण यूझर्स उडवतायत खिल्ली, पाहा Video

Dancing Dadलाही Kacha Badamची भुरळ, मुलासह दिला जबरदस्त परफॉर्मन्सनंतर! यूझरच्याही मजेशीर कमेंट्स

Trending बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral

..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.