AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kacha Badam : बंगालीनंतर आता हरयाणवी व्हर्जननं घातलाय धुमाकूळ, 32 लाखांहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video

Kacha Badam Hariyanvi Remix : बंगाली गाणं Kacha Badam हे सध्याच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक. पश्चिम बंगाल(West Bengal)च्या बीरभूम जिल्ह्यात हातगाडीवरचा विक्रेता भुबन बद्याकर (Bhuban Badyakar) नावाच्या व्यक्तीने गायले. आता त्याचे हरयाणवी व्हर्जन आलेय.

Kacha Badam : बंगालीनंतर आता हरयाणवी व्हर्जननं घातलाय धुमाकूळ, 32 लाखांहून जास्तवेळा पाहिला गेलाय 'हा' Video
कच्चा बदाम गाण्याचं हरयाणवी व्हर्जन
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 3:23 PM

Kacha Badam Hariyanvi Remix : बंगाली गाणं Kacha Badam हे सध्याच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याची क्रेझ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. विशेष म्हणजे, ते प्रसिद्ध गायकाने गायलेले नाही, तर पश्चिम बंगाल(West Bengal)च्या बीरभूम जिल्ह्यात हातगाडीवरचा विक्रेता भुबन बद्याकर (Bhuban Badyakar) नावाच्या व्यक्तीने गायले आहे. भुबन यांनी अनोख्या शैलीत गायलेले हे गाणे कोणीतरी रेकॉर्ड केल्यावर हे सर्व सुरू झाले. हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर आकर्षक सूर काढण्यास सुरुवात केली. नुकतेच या गाण्याचे हरयाणवी व्हर्जन तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर धुराळा उडाला आहे. यूझर्सना भुबन यांचा बदलेला गेटअप खूप आवडला आहे. 5 फेब्रुवारी रोजी यूट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

भुबनसोबत अमित धुल आणि निशा भट्ट

रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या ‘कच्चा बदाम’ गाण्यामुळे भुबनचा लुक आणि स्टाइल आता पूर्णपणे बदलली आहे. ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. आता या गाण्याला हरयाणवी ट्विस्ट मिळाला आहे, कारण रॅपर आणि गायक अमित धुलने भुबनच्या सहकार्याने त्याची हरयाणवी आवृत्ती रिलीज केली आहे. सोशल मीडिया यूझर्सना हा रिमेक खूप आवडतो आहे. हे गाणे बाजेवाला रेकॉर्ड्स हरयाणवीने रिलीज केले आहे. ज्यामध्ये भुबनसोबत अमित धुल आणि निशा भट्ट गाताना दिसत आहेत.

बाजेवाला रेकॉर्ड्सतर्फे अपलोड

बाजेवाला रेकॉर्ड्स हरयाणवीने ‘कच्छा बदम’ या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन यूट्यूबवर अपलोड केल्यापासून, त्याला 85,000हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, सुमारे 2 हजारहून अधिक लोकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘दोघांपेक्षा कितीतरी पटीने चांगला’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी सहदेव दिरदो आणि रानू मंडल यांचा उल्लेख करत लिहिले आहे, की भुबन या दोघांपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणखी एका यूझरने कमेंट करत लिहिले, की ‘मला गाण्याचे बोल अजिबात समजत नाहीत, पण मी खूप एन्जॉय करत आहे.’ दुसऱ्या यूझरने म्हटले आहे, की ज्या व्यक्तीने हे गाणे लिहिले त्याच्या गाण्याच्या तालावर संपूर्ण देश नाचतो, पण तरीही या माणसाला गळक्या घरात राहण्यास भाग पाडले जाते.

Video : तेरी शकल गंदी, ओ नल्ली, बासी बर्फी तू कल की…; Srivalli गाण्याचं Siblings Version पाहिलं का?

Viral : व्यवसाय तो ही मिठी मारण्याचा! Cuddle Therapistची ही अनोखी कहाणी; जाणून घ्या, किती कमाई करते…

वर म्हणतो, ‘मैं झुकेगा नहीं; यूझर्स म्हणतायत, आता नाही पण भांडी घासताना मात्र झुकावच लागेल! Video viral

जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.