जे बात! कांगारूंची दबंग स्टाईल हाणामारी, कुठेही पाहायला न मिळणारं दृश्य! व्हायरल
आपल्या हातात असतं तर आपण सगळ्यांची भांडणं लावून मजा बघत बसलो असतो नाही का? तुम्हालाही भांडण पाहायला आवडत असेल तर हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी.
आपण अनेकदा रस्त्यावर, बाजारात, घरात बऱ्याच बऱ्याच ठिकाणी लोकांची भांडणं (Fight) बघतो. कधी कधी तर लोकं अक्षरशः लाथा बुक्क्यांनी मारामारी करतात. आपल्या भारतीय लोकांना सुद्धा लोकांच्या भांडणात भलताच रस असतो. रस्त्यावर कुणी मारामारी करताना दिसलं की आपण कितीही घाईत असू, आपण वेळ काढून ती मारामारी पाहायला थांबू. असं कसं? भांडण ही आपली आवडती गोष्ट आहे. बघितल्याशिवाय पुढे जाणं म्हणजे त्या भांडणाचा अपमान नाहीये का? आपल्या हातात असतं तर आपण सगळ्यांची भांडणं लावून मजा बघत बसलो असतो नाही का? तुम्हालाही भांडण पाहायला आवडत असेल तर हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी. आवडत नसेल तरीही हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. का? कारण हा व्हिडीओ कांगारूंचा (Kangaroo Video) आहे. 2 कांगारू हे जबर हाणामारी करतायत. आता असं दृश्य आपल्याला कुठे रस्त्यावर पहायला मिळणारे होय? प्रचंड व्हायरल (Viral) झालेला कांगारूंचा व्हिडीओ खास तुमच्यासाठी…
व्हिडीओ
kangaroo’s have strong tails capable of supporting the weight of its entire body, you can see it being used that way here
It is the only known animal to use it’s tail as a fifth leg, the tail of a kangaroo walking works as hard as an actual human leg 1/2pic.twitter.com/EY1TlsuH7v
— Science girl (@gunsnrosesgirl3) September 15, 2022
हे कांगारू माणसांसारखेच भांडतायत नाही का? विशेष म्हणजे हे दोन कांगारू मारामारी करत असताना बाकीचे कांगारू हे भांडण मजा घेऊन बघतायत. जसा माणूस माणसांची भांडणं पाहतो अगदी तसंच.
आपण पाहिलं असेलच की ज्या पद्धतीने दोन व्यक्ती भांडत असतात आणि बाकीचे लोकं त्यांच्या भांडणातून सुटका करून घेण्याऐवजी त्यांची भांडणं पाहत राहतात, तसाच काहीसा प्रकार या व्हिडिओत पाहायला मिळतोय.
हे कांगारूंची आधी हातांनी लढाई सुरू करतात. मग मध्येच एखादी लाथ मारतात. “उडून बुक्की” असं कधी काय ऐकलंय का? हे दोघेही तसंच करतायत, एकमेकांना उडून बुक्की मारतायत.
बराच वेळ ते एकमेकांशी भांडतायत, पण माघार घेण्याचे नाव घेत नाहीत. आता त्यांची लढाई कुठे संपली असेल ते त्यांचं त्यांनाच माहित. पण ही लढाई हुबेहूब माणसांसारखी होती आणि त्यात मजाही होती.
कांगारूंचा हा फाइट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gunsnrosesgirl3 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आलाय.
अवघ्या 45 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 8 लाख 57 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
तुम्ही टीव्ही किंवा सोशल मीडियावर कांगारू पाहिले असतील हा ऑस्ट्रेलियात आढळणारा प्राणी आहे.
कांगारूला शाकाहारी आणि शांत प्राणी मानलं जातं. पण हा व्हिडीओ पाहून या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. अक्षरशः लाथा, बुक्क्यांनी मारामारी करणारे हे कांगारू बघू,”अरे बापरे” म्हणावं की “शो क्यूट” असा प्रश्न पडतो.