Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan शो बंद होताच ट्विटरवर मीम्सचा पाऊस; हार्दिक पांड्या, कंगनाचे भन्नाट मीम्स व्हायरल

आता कॉफी विथ करण हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याचं करणने जाहीर केलं. करणच्या या घोषणेनंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला. त्यात कंगना रनौत, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचे भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

Koffee With Karan शो बंद होताच ट्विटरवर मीम्सचा पाऊस; हार्दिक पांड्या, कंगनाचे भन्नाट मीम्स व्हायरल
MemesImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 3:04 PM

‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या आपल्या चॅट शोविषयी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) बुधवारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. हा शो बंद होणार असल्याचं त्याने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्पष्ट केलं. या लोकप्रिय शोचा सातवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. इतकंच नव्हे तर या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी येतील, याचासुद्धा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता कॉफी विथ करण हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याचं करणने जाहीर केलं. करणच्या या घोषणेनंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला. त्यात कंगना रनौत, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचे भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत. याच शोमध्ये करणचा कंगना रनौतशी वाद झाला होता. ज्यानंतर तिने करणवर घराणेशाहीचा आरोप केला होता. तर हार्दिकने त्याच्या खासगी आयुष्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती.

‘गेल्या सहा सिझन्सपासून कॉफी विथ करण हा शो माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा भाग होता. या शोद्वारे मी लोकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरलो आणि पॉप कल्चरच्या इतिहासातही आम्हाला आमची जागा मिळाली. तरीही अत्यंत जड अंत:करणाने मी हे सांगू इच्छितो की कॉफी विथ करण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही’, अशी पोस्ट करणने ट्विटरवर लिहिली. हीच पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांनी हास्यास्पद मीम्स शेअर केले आहेत.

काय असेल कंगनाची प्रतिक्रिया-

के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्याचे मीम्स

‘अखेर तो दिवस आला’

कॉफी विथ करण हा शो बंद झाल्याचा सर्वाधिक आनंद कंगना रनौत, हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुल यांना होत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय आणि त्यावरून मीम्स व्हायरल केले आहेत. 19 नोव्हेंबर 2004 रोजी या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाचे खुलासे केले होते.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.