VIDEO : आई-वडिलांचा भीषण अपघात, आकांताने रडणाऱ्या चिमुरडीसाठी होमगार्ड सरसावला, मनाला चटका लावणारा व्हिडीओ
केरळच्या एका होमगार्डचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय (Kerala home guard viral video).
तिरुवनंतपुरम (केरळ) : या जगात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रचंड घटना घडतात. मात्र, तरीदेखील या जगात अजूनही माणुसकी जिवंत आहे. त्याचं मूर्तीमंत उदाहरण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि ते उदाहरण म्हणजे केरळच्या एका हॉस्पिटलमधील होमगार्ड. या होमगार्डचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. विशेष म्हणजे केरळच्या पोलिसांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे संबंधित होमगार्ड सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या होमगार्डचं नाव के एस सुरेश असं आहे (Kerala home guard viral video).
नेमकं प्रकरण काय?
केरळमध्ये एक कुटुंब कारने कयामकुलम शहराच्या दिशेला जात होतं. मात्र वाटेत त्यांच्या कारचा ट्रकसोबत भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील कुटुंबिय गंभीर जखमी झाले. कुटुंबातील एका लहान मुलीचा मृत्यू झाला. तर इतरांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या कुटुंबात एक सात महिन्यांची चिमुकली आहे. ती चिमुकली अपघात झाल्यादिवशी रात्री जीवाच्या आंकाताने प्रचंड जोरजोरात रडत होती (Kerala home guard viral video).
होमगार्डचा मायाळू स्वभाव
चिमुकलीचा रडण्याचा आवाज ऐकून रुग्णालयातील होमगार्ड तिच्याजवळ गेला. त्याने तिला पाळण्यातून बाहेर काढलं आणि कडेवर घेऊन तिला थोडं बाहेर फिरवलं. होमगार्ड सुरेश बराचवेळ चिमुरडीला कडेवर घेऊन तिला खेळवत होते. त्यानंतर थोड्यावेळात चिमुकलीचे नातेवाईक तिथे आले. त्यांनी होमगार्डकडून मुलगी आपल्याकडे घेतली.
व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, होमगार्ड जेव्हा चिमुरडीला रुग्णलयाबाहेर मायेने फिरवत होता तेव्हा कुणीतरी त्या क्षणाचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, केरळच्या पोलिसांनाही या व्हिडीओची दखल घ्यावी लागली.
केरळ पोलिसांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहा :