तिरुअनंतपुरम: मारुती सुझुकी फक्त भारतातच नाही तर अनेक देशात प्रसिद्ध आहे. ही गाडी 9 एप्रिल 1983 मध्ये भारतात आली. तुमच्या लहानपणी तुम्ही बघत असाल की समजा कुणी गाडी घेतली की ती मारुतीच असायची. मारुती 800 हे मॉडेल तर सगळ्यात जास्त प्रसिद्ध होतं. लोकांना याचं खूप क्रेझ होतं. त्याकाळी ज्या देशात लोक पायी चालायचे, सायकल चालवायचे, फार फार तर रेल्वेने जायचे त्याकाळात आपल्या देशात लोक मारुती घेऊ लागले होते. भारतासाठी मारुती सुझुकी ही फार अभिमानाची गोष्ट होती. आता जेव्हा टाटाची नॅनो आली होती तेव्हा सुद्धा लोकांमध्ये अशीच उत्सुकता होती. त्यानंतर बऱ्याच चांगल्या गाड्या आल्या पण मारुती 800 आजही मनामनांत आहे.
मारुतीने सगळ्यांना इतकं वेड लावलं होतं की केवळ 2 महिन्यात 1.35 लाख गाड्यांची बुकिंग झाली होती. जस-जशी वेळ पुढे गेली तस-तसं या गाडीत बदल होत गेले पण तरीही या बदलांसहित ही गाडी लोकांच्या पसंतीस उतरत होती. आजही ही गाडी अनेक लोकांकडे आहे पण आता जुन्या गाडा मॉडिफाय केल्या जातात. गाडीचा लूक पूर्णपणे बदलून टाकणे, गाडी मॉडिफाय करणे याची एक वेगळी क्रेझ सध्या लोकांमध्ये आहे. असाच एक किस्सा समोर आलाय जे बघून लोक प्रचंड हैराण झालेत.
इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मारुती 800 ला मॉडिफाय केलेलं आहे ही गाडी बघून तुम्हाला धक्काच बसेल. केरळच्या हदीफ नावाच्या एका मुलाने आपल्या युट्युब चॅनल ट्रिक्स ट्यूब वर गाडीचे डिटेल्स शेअर केलेले आहेत. यात त्याने गाडी मॉडिफाय का करावी वाटली हे सुद्धा सांगितलंय.
ही कार कुणाची आहे याबाबतची माहिती मिळालेली नाही. कारच्या पुढच्या बाजूला मोठ्या आकाराचं ग्रील लावण्यात आलंय. या ग्रीलमुळे ही गाडी रोल्स रॉयससारखी दिसतीये. हा चमत्कार त्याने फक्त 45 हजारांमध्ये केलाय. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की जर तुम्ही हे वाहन कुठे घेऊन गेलात तर तुम्हाला पकडलं जाऊ शकतं. तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आणि तुमचे वाहन जप्त सुद्धा केले जाऊ शकते.