अबुधाबी : एका भारतीय महिलेला (Indian woman) अबुधाबीमध्ये कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे. लॉटरी लागल्याने ही महिला मालामाल झाली आहे. या महिलेने बिग तिकिट लॉटरीचे (Big Ticket Lottery) बक्षिस जिंकले आहे. मीडिया रिपोर्टसनुसार लीना जलाल असे या महिलेचे नाव आहे. लीना जलाल या केरळमधील त्रिशूर येथील रहिवाशी आहेत. त्यांना बिग तिकिट लॉटरी अबुधाबी वीकली ड्रॉमध्ये तब्बल 22 दशलक्ष दिरहम (Dirham) म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 44.75 कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. या लॉटरीचा ड्रॉ 3 फ्रेब्रुवारीला काढण्यात आला होता. यामध्ये जलाल यांनी ही लॉटरी जिंकली. या महिलेचा तिकीट क्रमांक 144387 असा होता. याच नंबरला हे बक्षिस लागले आहे. लीना जलाल या अबुधाबीमध्ये एका कंपनीत काम करतात. त्यांना जेव्हा लॉटरी लागल्याचे कळाले तेव्हा प्रथम त्यांचाही यावर विश्वास बसला नाही.
लीना जलाल यांना बिग तिकिट लॉटरी अबुधाबी वीकली ड्रॉमध्ये तब्बल 22 दशलक्ष दिरहम म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 44.75 कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. जेव्हा त्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना हे खरे वाटले नाही, मात्र त्यांनी जेव्हा याची खात्री केली तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. एवढ्या सगळ्या पैशाचे त्या काय करणार असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर देताना सांगितले की, ते ही रक्कम दहा लोकांमध्ये शेअर्स करणार असून, त्या यातील एक वाटा चॅरिटी ट्रस्टला देखील देणार आहोत.
विशेष म्हणजे या लॉटरीचे बक्षीस जिंकणाऱ्या लीना जलाल या एकमेव भारतीय महिला नव्हत्या तर केरळमधील आणखी एका अनिवासी भारतीयाने दहा लाख दिरहम म्हणजे तुसमारे 2.03 कोटी रुपये जिंकले आहेत. संबंधित व्यक्ती ही मलप्पुरम जिल्ह्यातील रहिवाशी असून, आपण ही रक्कम 29 जणांसोबत शेअर करणार असल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही व्यक्ती अबुधाबीमध्ये अभियंता आहे.
Viral Kid skating : 3 वर्षाच्या चिमुकल्याचं परफेक्ट स्केटिंग! ‘हा’ Video पाहतच राहाल
#LataMangeshkar : लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर; लवकर बऱ्या व्हा, सोशल मीडियावर लोक करताहेत प्रार्थना