Kiara-Sidharth wedding | ‘आपकी कुंडली मे आलिया से विवाह..’, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नावरून भन्नाट मीम्स व्हायरल!

सिद्धार्थ-कियाराचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र त्याआधी सोशल मीडियावर या लग्नावरून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावरून व्हायरल होणारे हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!

Kiara-Sidharth wedding | 'आपकी कुंडली मे आलिया से विवाह..', सिद्धार्थ-कियाराच्या लग्नावरून भन्नाट मीम्स व्हायरल!
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नावरून भन्नाट मीम्स व्हायरल!Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 1:54 PM

मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. बॉलिवूडमधल्या या लोकप्रिय जोडीचं लग्न राजस्थानमधील जैसलमेर याठिकाणी होणार आहे. सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ-कियाराचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र त्याआधी सोशल मीडियावर या लग्नावरून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावरून व्हायरल होणारे हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!

बॉलिवूडमधल्या मोठ्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या वेळी नेहमीच सोशल मीडियावर मीम्सचा पूर येतोय. याआधी रणवीर सिंग-दीपिका पदुकोण, विकी कौशल-कतरिना कैफ, रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या वेळीही मीम्सना उधाण आलं होतं. त्यामुळे आता सिद्धार्थ-कियारासुद्धा अपवाद ठरले नाहीत.

हे सुद्धा वाचा

कियारा अडवाणीचं खरं नाव आलिया आहे. मात्र इंडस्ट्रीत आधीच एक आलिया असल्याने तिने तिचं नाव बदलून कियारा असं ठेवलं. विशेष म्हणजे कियाराचा होणारा पती सिद्धार्थ मल्होत्राने तिच्याआधी अभिनेत्री आलिया भट्टला डेट केलं होतं. त्यामुळे नावातील हा योगायोग नेटकऱ्यांनी अचूक वेधला आहे.

पहा मीम्स-

सलमान खानचं दु:खच वेगळं

कियाराच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी पळणारा ‘कबीर’

लग्न घोषित होताच जैसलमेर एअरपोर्टवरील परिस्थिती-

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहणारे सामान्य नेटकरी-

लग्नानंतरचं कियाराचं नाव-

सिद्धार्थ-कियाराची पहिली भेट ही ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटानिमित्त आयोजित केलेल्या एका पार्टीत झाली. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आणि याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघं येत्या 7 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय.

या लग्नासाठी कियारा आणि सिद्धार्थ त्यांच्या कुटुंबीयांसह शनिवारी जैसलमेरला रवाना झाले. यावेळी एअरपोर्टवर कियारा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत दिसली. त्यामुळे ती लग्नात मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहंगा परिधान करणार असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.