देवाघरचं फूल! 3 वर्षाच्या मुलाने केली आईची पोलिसांत तक्रार!
तो नेमकी कसली तक्रार करत असेल बरं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
आजकाल लहान मुलं प्रचंड हुशार आहेत. “आजकाल” म्हणायचं कारण असं की स्मार्ट फोन यायच्या आधी लहान मुलांना बऱ्याच गोष्टी माहित नसायच्या पण आता हेच चित्र बदललेलं आहे. मुलांना आता सगळं माहित असतं. फोन हातात असतो, त्यांच्या हातात जरी नसला तरी त्यांच्या आई वडिलांच्या हातात असतोच असतो. सगळं निरीक्षण ते अगदी व्यवस्थितपणे करत असतात. आता बघा ना, हा मुलगा आईची तक्रार करतोय, बरं ती तक्रार कुठे करतोय? पोलिसांकडे! होय. अहो इतकंच काय तो त्याच्या आईला तुरुंगात टाका म्हणतोय. आता या मुलाच्या हुशारीचं कौतुक करावं की काय करावं असा प्रश्न पडतो.
अवघ्या तीन वर्षांच्या एका लहान मुलाने आईच्या चोरीच्या कृत्याला वैतागून पोलिस ठाणे गाठले. त्याने त्याच्या आईची तक्रार महिला पोलिसांकडे केली.
हाच व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा महिला पोलीस कर्मचाऱ्याला खेळताना आईची तक्रार करतो. ती महिला पोलीस सुद्धा त्या लहान मुलाच्या तक्रारीची दखल घेते.
मम्मी के खिलाफ शिकायत लिखाने थाने पहुंचा तीन साल का मासूम बोला- मेरी मम्मी चोरी करती हैं मेरा चॉकलेट, जेल में डाल दो, देखें वायरल वीडियो pic.twitter.com/NwWbvz1Bmo
— Priya singh (@priyarajputlive) October 17, 2022
तो नेमकी कसली तक्रार करत असेल बरं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. खरं तर या तीन वर्षाच्या मुलाची आई अनेकदा त्याच्याकडे असलेलं चॉकलेट चोरते.
याचाच राग त्या मुलाला आलाय आणि तो त्याच्या आईची तक्रार करतोय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूल तक्रार तर करतंच, पण आईला तुरुंगात डांबायलाही सांगतंय.
व्हिडिओमध्ये महिला पोलीस वारंवार विचारते की मम्मी आणखी काय करते? मूल खेळताना सर्व काही सांगून जातंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसूही येईल.