Video: तारेवर लटकल्या मांजरीच्या पिलांची जुगाडाने सुटका, लोक म्हणाले, आम्हाला ‘इश्क’ सिनेमाचा तो सीन आठवला!
या मांजरींना वाचवण्यासाठी या महाशयांनी एक जुगाड केला आहे, या जुगाडामुळे मांजरींना तारेवरुन खाली उतरता आहे. हा जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच या व्यक्तीचं कौतुक कराल.
सोशल मीडियावर असे व्हिडिओ अनेकदा पाहायला मिळतात, ज्यामुळे तुमचा दिवस आनंदात जातो. लहानपणीपासूनच आपल्याला शिकवलं जातं की, गरजूंना नेहमी मदत करावी. तुम्हीही अनेकदा असं केलं असेल. लोक माणसांचीच नाही, तर प्राण्यांचीही मदत करतात, त्यांना संकटातून वाचवतात, अशी अनेक उदाहरणं, व्हिडीओ आपण पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तारेवर लटकलेल्या मांजरींच्या पिलांना वाचवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडला आहे (kitten saved by Man did jugaad save two cats hanging on the wire Funny viral video)
या व्हिडिओमध्ये मदत करणाऱ्या व्यक्तीने मांजरींच्या पिल्लांचे प्राण वाचवून, आपल्यासमोर माणुसकीचे उदाहरण ठेवले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण या मांजरींना वाचवण्यासाठी या महाशयांनी एक जुगाड केला आहे, या जुगाडामुळे मांजरींना तारेवरुन खाली उतरता आहे. हा जुगाड पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच या व्यक्तीचं कौतुक कराल.
पाहा व्हायरल व्हिडीओ:
“Be kind whenever possible. It’s always possible “ pic.twitter.com/q8LQWAC4ux
— Susanta Nanda (@susantananda3) December 3, 2021
व्हिडीओमध्ये 2 मांजरीची पिलं तारेवर लटकलेली दिसत आहेत, या पिलांना खाली उतरता येत नाही. ती आपल्या जीव वाचवण्यासाठी एकमेकांचाही आधार घेत आहे, ही गोष्ट तिथं हजर असलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात येते, हा व्यक्ती तातडीने एक बादली घेतो, त्याला बांबू बांधतो आणि बांबू बांधलेली बादली थेट या पिलांच्या खाली नेतो. ही पिलं पडणार, तोच ही बादली पिलांच्या खाली येते, आणि ही पिलं बादलीत पडतात.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही IFS अधिकारी सुसंता नंदा यांच्या पेजवर सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा शक्य असेल तेव्हा दयाळू व्हा. असं करणं तर नेहमीच शक्य आहे. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते सोशल मीडियाच्या इतरही प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 50 हजार वेळा पाहिला गेला आहे. लोक व्हिडिओवर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिले – खूप सुंदर प्रयत्न, दुसऱ्याने लिहिले – प्रत्येकाने असेच केले पाहिजे. एकाने लिहिले – हा व्हिडीओ हिंदी चित्रपट इश्कमधील दृश्याची आठवण करून देतो, जिथं आमिर खान आणि अजय देवगण पाईपला लटकले होते.
हेही पाहा: