International Youth Day 2022 : आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस! जाणून घ्या यंदाची थीम आणि महत्व…

गेल्या 22 वर्षांपासून 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. तरूण पिढीसाठी समर्पित अशा या दिवशी तरूणांमध्ये कायदेशीर समस्या आणि त्यांच्या सांस्कृतिक विषयांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

International Youth Day 2022 : आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस! जाणून घ्या यंदाची थीम आणि महत्व...
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 9:31 AM

International Youth Day 2022 : कोणत्याही देशासाठी तरुण पिढीने भाग घेऊन काम करणे , हे खूप महत्वाचे असते. विकसित आणि विकसनशील, अशा दोन्ही देशांमध्ये तरुणांच्या समोर मानसिक आणि सामाजिक आव्हाने येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तरुणांनी (Youth) जागरुक राहणे आणि विविध आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असणे, अतिशय गरजेचे असते. तरुण पिढीमध्ये कायदेशीर मुद्दे आणि त्यांच्या सांस्कृतिक विषयांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट (12th August) रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस (International Youth Day) साजरा करण्यात येतो. 1998 साली सर्वप्रथम जागतिक परिषदेने आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची सूचना केली होती. या परिषदेत सहभागी झालेल्या मंत्र्यांनी युवा पिढीसाठी समर्पित असा एक दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर पुढील वर्षी, 1999 साली संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

17 डिसेंबर 1999 पासून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यााचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत घेण्यात आला, मात्र 12 ऑगस्ट 2000 सालापासून हा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. 2103 साली YOUTHINK ने एक आंतरराष्ट्रीय युवा सम्मेलनाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तीमत्वांचे भाषण झाले तसेच एक पुरस्कार सोहळाही पार पडला.

आंतरराष्ट्रीय युवा दिवस 2022 ची थीम

दरवर्षी एक नवी थीम घेऊन आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा (2022साली) ‘ Intergenerational Solidarity: creating a world for all ages’ (आंतरजातीय सॉलिडॅरिटी : सर्व वयोगटांसाठी एक जग निर्माण करणे) ही थीम आहे. ‘ अजेंडा 2030 आणि त्याचे 17 एसडीजी (शाश्वत विकास उद्दीष्टे) साध्य करण्यासाठी, सर्व वयोगटातील लोकांना एकत्र घेणे आवश्यक आहे. तसेच कोणालाही मागे सोडता येणार नाही’ हा संदेश पसरवणे हेच या थीमचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी ‘युवा पिढीला चांगले शिक्षण, दिशा आणि मार्गदर्श मिळावे’ या थीमसह आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय युवा दिवसाचे महत्व

सर्व वयोगटातील लोकांना एकत्र घेऊन चालणे तसेच वयानुसार लोकांमध्ये होणारा भेदभाव संपवणे, ज्यामुळे युवा पिढी आणि ज्येष्ठ पिढी दोघांवरही परिणाम होतो. असा भेदभाव संपवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याशिवाय तरूण पिढीचा आवाज, त्यांचे प्रयत्न आणि ते करत असलेले कार्य ओळखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संधी देणे यासाठीही आंतरराष्ट्रीय युवा दिवस महत्वाचा ठरतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.