आशिया खंडातील लाओस देशात 'प्लेन ऑफ जार' म्हणजेच माठांचं मैदान आहे. या ठिकाणी मोठमोठ्या दगडांपासून बनवलेले रहस्यमय माठ आहेत. ते पाहून जग हैराण होतं.
लाओसमधील शियांगखुआंग भागात असे माठ आढळणारे 90 ठिकाणं आहेत. या ठिकाणी 400 पेक्षा अधिक दगडी माठ आहेत. अनेक माठांवर दगडाचीच झाकणं देखील आहेत. या माठांची उंची 1 ते 3 मीटरपर्यंत आहे.
1964 ते 1973 दरम्यान व्हिएतनाम (Viyatnam) युद्धाच्या काळात अमेरिकेच्या वायु सेनेने शियांगखुआंग प्रातात 26 कोटीपेक्षा अधिक क्लस्टर बॉम्ब टाकले होते. यातील अनेक बॉम्ब आजही जीवंत आहेत.
पुरातत्व खात्याच्या तज्ज्ञांनुसार हे रहस्यमय दगडी माठ लोह युगातील आहेत. मात्र, त्या काळात याची निर्मिती कशासाठी झाली याचं कारणं अद्यापही सापडलेलं नाही. मात्र, काही वैज्ञानिकांनी हे माठ अंत्यसंस्कारासाठी तयार केले असावेत असा अंदाज व्यक्त केलाय.
या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलाय. 6 जुलै 2019 रोजी हा दर्जा मिळाला.