Tipu Sultan च्या काळातल्या मंदिरातील “सलाम आरतीचं” नाव बदललं, BJP सरकारने सांगितलं कारण

आपण ही नावं नेमकी का बदलतोय याचं कारण सरकारने दिलंय, जाणून घेऊया त्याबद्दल.

Tipu Sultan च्या काळातल्या मंदिरातील सलाम आरतीचं नाव बदललं, BJP सरकारने सांगितलं कारण
Tipu SultanImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 11:14 AM

कर्नाटक सरकारने 18 व्या शतकातील राजा टिपू सुलतानच्या काळातील मंदिरांमधील आरतींची नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. सलाम आरती, सलाम मंगल आरती आणि दीवतिगे सलाम आरतींची नावं बदलण्याचा हा निर्णय आहे. या प्रथांची नावं बदलून त्याला स्थानिक नावं देण्यात येणार आहे, असा निर्णय भाजप सरकारने घेतलाय. आपण ही नावं नेमकी का बदलतोय याचं कारण कर्नाटक सरकारने दिलंय, जाणून घेऊया त्याबद्दल.

टिपू सुलतानच्या काळातील मंदिरांमध्ये होणाऱ्या ‘सलाम आरती’, ‘दीवतिगे सलाम’ आणि ‘सलाम मंगल आरती’चे नाव स्थानिक नावांनी बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले. प्रथा परंपरांचं फक्त नाव बदलण्यात येणार आहे, ही परंपरा बंद होणार नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

आता दीवतिगे सलामचे नाव “दीवतिगे नमस्कार”, सलाम आरतीचं नाव “नमस्कार आरती” आणि सलाम मंगल आरतीचं नाव “मंगल आरती” असे नाव देण्यात येईल, असं निश्चित करण्यात आलंय असं मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले. हा निर्णय विभागातील वरिष्ठ पुजाऱ्यांच्या मतावर आधारित आहे. याबाबत परिपत्रकही काढण्यात येणार आहे.

शशिकला जोल्ले म्हणाल्या की, कर्नाटकच्या राज्य धार्मिक परिषदेच्या बैठकीत काही भाविकांनी या आरत्यांच्या नामांतराची मागणी केली होती, याकडे काही सदस्यांनी लक्ष वेधलं होतं. बैठकीत यावर विस्तृत चर्चा झाली.

मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, प्रथा परंपरा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. फक्त त्यांची नावं बदलली जातील. या नावात आपल्या भाषेतील शब्दांचा समावेश असेल.

विशेष म्हणजे, भाजप आणि काही हिंदू संघटना टिपू सुलतानला ‘क्रूर हत्यारा’ म्हणून पाहतात. याशिवाय काही कन्नड संघटना टिपू सुलतानला कन्नडविरोधीही संबोधतात.

टिपूने स्थानिक भाषेऐवजी पर्शियन भाषेचा प्रचार केला, असा आरोप त्याच्या वतीने केला जातो. म्हणूनच या आरत्यांची नावं बदलून ती नावं स्थानिक भाषेत बदलण्यात येणार आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.