दोन ओळींत लाख मोलाचा उपदेश, प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंकांच्या ट्वीटला मिळतेय नेटकऱ्यांची पसंती!
देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) इंटरनेट जगतात खूप सक्रिय आहेत. दररोज ते काही ना काही मनोरंजक शेअर करत असतात. त्यांनी केलेले ट्वीट लोकांना आवडतात, कारण त्यात काही ना काही मनोरंजक, शिकण्यासारखं किंवा हृदयाला स्पर्श करणारं असंत.
मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) इंटरनेट जगतात खूप सक्रिय आहेत. दररोज ते काही ना काही मनोरंजक शेअर करत असतात. त्यांनी केलेले ट्वीट लोकांना आवडतात, कारण त्यात काही ना काही मनोरंजक, शिकण्यासारखं किंवा हृदयाला स्पर्श करणारं असंत. यावेळी पुन्हा त्यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक अतिशय लाखमोलाचं उपदेश देणारं ट्वीट शेअर केलं आहे. हे ट्वीट वाचल्यानंतर तुम्हीही थोडा वेळ विचार करायला भाग पडाल.
उद्योगपती हर्ष गोएंका जेव्हा त्यांच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही पोस्ट शेअर करतात, तो कन्टेंट लगेच व्हायरल होतो. उद्योगपती गोएंका सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा त्यांच्या ट्विट्सबद्दलही चर्चेत असताच. असेच त्यांचे नवे ट्वीटदेखील चर्चेत आले आहे.
पाहा ट्वीट
Price of water bottle in supermarket is Rs 10, in a cafe is Rs 50 and in a 5 star hotel is Rs 300.
Same bottle. Same brand. Only the place changes. Each place gives a different value to the same thing.
If you feel worthless, change your surrounding. Always increase your value. pic.twitter.com/GNEvRuRC99
— Harsh Goenka (@hvgoenka) November 22, 2021
काय म्हणाले हर्ष गोएंका?
‘सुपरमार्केटमध्ये पाण्याच्या बाटलीची किंमत 10 रुपये आहे, कॅफेमध्ये 50 रुपये आहे आणि 5 स्टार हॉटेलमध्ये 300 रुपये.
तीच बाटली. समान ब्रँड. फक्त जागा बदलते. प्रत्येक ठिकाण एकाच गोष्टीला वेगळे मूल्य देते.
जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी निरुपयोगी असल्यासारखे वाटत असेल, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरण बदला. आपले मूल्य नेहमी वाढते ठेवा’, असे त्यांनी आपल्या या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप पसंत केले जात आहे.
नेटकरी करतायत वाहवा!
What a Quote !!! 100% ?
— BIKI BALLAV (@ballav_biki) November 22, 2021
कोई कुछ भी कहे… आप ज्ञानी तो हो ! प्रणाम है आपको ।
— Dr. Jai Tharur (@JaiTharur) November 22, 2021
So true ??
— Ashish Mohan Gupta (@ashmg2000) November 22, 2021
No matter about surrounding and place , first you have to give value and respect to yourself then people will do. pic.twitter.com/CVZlp5T9Oa
— Mybusinesstrades (@Mybusinesstrad1) November 22, 2021
हेही वाचा :
Viral Video | माकडांनी पहिल्यांदा मोबाईल पाहून असं काही केलं, तुम्हीही ते बघून आवाक व्हाल
Viral Video | पाण्यात नाही तर फँटामध्ये शिजवली मॅगी, हा व्हिडीओ कृपया आपल्या रिस्कवर पाहावा
Video | बिबट्या आधी दबा धरुन बसला, नंतर घेतली झेप, हरिणाच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ व्हायरल