“लल्लू”राम इज नो मोअर लल्लू! जबरदस्त चाहते, सगळ्यांनाच सेल्फी हवा! फोटो व्हायरल
पूर्वी उष्णतेच्या लाटेमुळे लल्लूरामची तब्येत बिघडली होती. यामुळे त्याला आपलं घर चालवताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
लल्लूराम नावाचा एक माणूस आहे. 77 वर्षाचा हा लल्लूराम सध्या प्रचंड चर्चेत आहे. तो बाहेर निघाला की लोकं पटकन फोटो काढायला त्याच्याकडे धावत जातात. सध्या त्याचे फोटो इतके व्हायरल होतायत की बास…! सोशल मीडियावर जुगाडू फोटो खूप व्हायरल होतात. या लल्लूरामने डोक्यावर पंखा फिट केलाय. खरं तर फोटोत दिसणाऱ्या या लल्लूरामची कल्पना इतकी अप्रतिम आहे की, त्याचं कौतुक करण्यापासून तुम्ही सुद्धा स्वत:ला रोखू शकणार नाही.
हा फोटो उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील आहे. या व्यक्तीने, लल्लूरामने प्लास्टिकची टोपी घातलीये आणि डोक्यावर सोलर पॅनल बसवलंय.
लल्लूराम पैसे कमवण्यासाठी लिंबू आणि फुलांच्या माळा विकतो. खूप गरम होतं म्हणून लल्लूरामने हा जुगाड केलाय. डोक्यावरच फॅन लावलाय. यामुळे लल्लूराम एकदम वेगळा दिसून येतोय.
पूर्वी उष्णतेच्या लाटेमुळे लल्लूरामची तब्येत बिघडली होती. यामुळे त्याला आपलं घर चालवताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. आपल्या घराची आर्थिक स्थिती आणखी बिघडण्यापासून वाचवण्यासाठी त्या माणसाला उष्णता टाळण्यासाठी एक कल्पना सुचली.
लल्लूरामने शक्कल लढवून स्वतःचा उकाड्यापासून बचाव केलाय. उन्हापासून आराम मिळावा म्हणून त्याने त्याच्या चेहऱ्यासमोर पंखाही लावलाय.
त्याचा सोलर फॅन पाहून अनेक जण त्याचे फॅन झाले. लल्लूराम आपल्या कामासाठी अशा प्रकारे सोलर फॅन लावून घराबाहेर पडतात तेव्हा सेल्फी काढण्यासाठी अनेक जण त्यांच्याजवळ धावून येतात.
या सोलर फॅनसोबतचा लल्लूरामचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.