बारावीत कमी मार्क्स म्हणून घर भाड्यानं देण्यास नकार, घरमालक होतोय जबरदस्त ट्रोल!
मोठमोठ्या शहरांमध्ये लोकांना सहज नोकऱ्या मिळतात, पण घर शोधताना क्लास टॉपरही इथे नापास होतो कारण कुणाला चांगला भाडेकरू भेटत नाही तर कुणाला चांगला घरमालक भेटत नाही. जिथे दोन्हीही छान असतं तिथे भाडं परवडत नाही.
मुंबई: आजकाल मोठ्या शहरांमध्ये घर किंवा फ्लॅट शोधणं हे स्वत:च खूप मोठं काम आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये लोकांना सहज नोकऱ्या मिळतात, पण घर शोधताना क्लास टॉपरही इथे नापास होतो कारण कुणाला चांगला भाडेकरू भेटत नाही तर कुणाला चांगला घरमालक भेटत नाही. जिथे दोन्हीही छान असतं तिथे भाडं परवडत नाही. सोशल मीडियावर असे अनेक किस्से आहेत जिथे घरमालक आणि भाडेकरू बोलत असतात. असाच एक प्रकार कर्नाटकातील बेंगळुरूमधून समोर आला आहे. जिथे घरमालकाने भाडेकरूला शाळेत चांगले मार्क्स नसल्यामुळे घर देण्यास नकार दिला.
असे म्हटले जाते की, शाळेत येणारे तुमचे मार्क्स तुमच्याबद्दल जगाला सांगत नाहीत, तर तुमची मेहनत सांगते. ज्याद्वारे तुम्ही जगाला योग्य किंवा अयोग्य सिद्ध करता. या मार्क्सचा तुमच्या करिअरवर परिणाम होत नसला तरी चांगली रूम हवी असेल तर मार्क्सही चांगले आणावे लागतील. असेच काहीसे बेंगळुरूमधील एका भाडेकरूच्या बाबतीत घडले ज्याचे मार्क्स कमी होते. बारावीत मार्क्स कमी मिळाल्याने त्याला चक्क भाड्याने खोली मिळाली नाही. इंटरनेटवर यासंदर्भातले स्क्रीनशॉट वेगाने व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
@kadaipaneeeer नावाच्या अकाऊंटवरून एका चॅटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करण्यात आला. ती म्हणाली की तिच्या भावाला बेंगळुरूमध्ये भाड्याची खोली मिळाली नाही कारण त्याने बारावीत कमी गुण मिळवले होते. स्क्रीनशॉटनुसार, योगेश आणि ब्रजेश नावाच्या ब्रोकरमध्ये ही चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये ब्रोकर सांगतो की, तुमच्या प्रोफाईलला घरमालकाने मान्यता दिली आहे. आता तुम्हाला फक्त काही कागदपत्रांची गरज आहे. यामध्ये दहावीच्या गुणपत्रिका, लिंक्डइन/ट्विटर प्रोफाइल आणि कंपनीच्या ऑफर लेटरचा समावेश आहे.
“Marks don’t decide your future, but it definitely decides whether you get a flat in banglore or not” pic.twitter.com/L0a9Sjms6d
— Shubh (@kadaipaneeeer) April 27, 2023
या सर्व गोष्टी पाठवल्यानंतर ब्रोकरला मेसेज येतो की, बारावीत तुझे ७५ टक्के गुण होते म्हणून घरमालकाने तुझे प्रोफाईल रद्द केले… त्यांना 90 टक्के गुण असलेला भाडेकरू हवा आहे. या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करताना शुभने लिहिले की, “मार्क्स तुमचे करिअर ठरवू शकत नाही, पण हे निश्चित आहे की जर तुमचे मार्क खराब असतील तर तुम्हाला बेंगळुरूमध्ये भाड्याने घर मिळणार नाही.” ज्यानंतर लोकांनी घरमालकाला ट्रोल केले.