मुंबई : सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात प्राण्याचे व्हीडिओ अधिक असतात. असाच एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे. यात सिंह (Lion) जिराफवर (Giraffe) झडप घालताना पाहायला मिळत आहे. पण जिराफ इतका उंच आहे की सिंह त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे झडप घालूनही फायदा होत नाही. तो खाली पडतो. त्याला दुखापत होते.
एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळत आहे. यात 3-4 सिंह जिराफवर झडप घालताना पाहायला मिळत आहे. पण जिराफ इतका उंच आहे की सिंह त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे झडप घालूनही फायदा होत नाही. तो खाली पडतो. त्याला दुखापत होते. सिंहांचा हा घोळका जिराफवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण जिराफ जुमानत नाही. जिराफाला सिंहांच्या घोळक्याने वेढलेलं दिसतंय. हे सगळे सिंह एकामागून एक त्या जिराफावर हल्ला करताना दिसत आहेत.
जिराफ त्याच्या उंचीचा फायदा घेत सिंहांवर प्रतिहल्ला करतो. त्यांना लाथा मारतो. हा व्हीडिओ wildlife_stories_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.या व्हीडिओला आतापर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडे चार लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.
यात एक सिंह आणि त्याचे साथीदार जिराफवर उडी मारून त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.पण यात जिराफाची जिद्द पाहून अकेनांना प्रेरणा मिळत आहे. अनेकांनी तश्या कमेंट केल्याचंही पाहयला मिळतंय. एका नेटकऱ्याने लिहिलंय की आपला प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य असला तरी त्याला हरवण्याची ताकद आपल्यात असते त्यामुळे खंबीर राहा. दुसरा म्हणतो की, जिद्द असावी तर अशी.