कुठल्याही प्राण्याला कुरवाळून कसं चालेल? गोष्टी जीवावर बेतू शकतात…हा व्हिडीओ बघा!
हे इतकं अचानक घडतं की माणसाच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसते.

या व्हिडीओ मध्ये दोन सिंहाची पिल्लं आहेत. इतकी गोंडस पिल्लं आहेत ही की या पिल्लांना बघून कुणालाही त्यांना गोंजारावं असंच वाटेल. हा व्हिडीओ मधला माणूस सुद्दा तेच करतो. तो त्यांना कुत्र्यासारखं वागवायला जातो आणि मग त्याची वाट लागते. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. एक व्यक्ती या व्हिडिओत सिंहाच्या पिल्लाचं डोकं कुरवाळण्याचा प्रयत्न करतो, तितक्यात ते पिल्लू त्याच्यावर झडप घालतं. हे इतकं अचानक घडतं की माणसाच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसते.
सध्या तरी हा व्हिडिओ कधी आणि कुठे काढण्यात आलाय याची माहिती मिळाली नाही. पण हा व्हिडिओ पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की सिंहाच्या पिल्लासोबत असं वागणं जीवावर बेतू शकतं. जरी आपण त्यांना पाळलं असलं तरी शेवटी जो सिंह तो सिंहच!
सिंहाची दोन मुलं सेडान गाडीच्या मागे असलेल्या डिक्कीवर बसलेली आहेत. एक माणूस कुत्र्यासारखा त्यांना कुरवाळत असतो. अचानक एका पिलाला राग येतो. कॅमेऱ्याकडे पाहून तो एक खतरनाक एक्सप्रेशन देतो.
अशा परिस्थितीत ती व्यक्ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताच ते सिंहाचं पिल्लू त्याच्यावर झडप घालतं. ताबडतोब तो मुलगा घाबरून हात मागे घेतो.
View this post on Instagram
हा व्हिडिओ 23 सप्टेंबर रोजी basit_ayan_3748 इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला होता, जो सोशल मीडियावर खूप पाहायला मिळतोय.