Messi चे चाहते नियंत्रणाबाहेर; वर्ल्ड चॅम्पियनला हेलीकॉप्टरने काढलं बाहेर
रस्त्यावर लोक आपल्या चॅम्पियन खेळाडूंच्या स्वागतासाठी उतरले होते. इथे जमिनीवर पाय ठेवायलाही जागा नव्हती.
अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजेत्याने तब्बल 36 वर्षांनी फिफा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ऐतिहासिक विजेतेपद पटकावल्यानंतर अर्जेंटिनाचे खेळाडू आपल्या देशात परतले, तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. इतकंच नाही तर या खेळाडूंनी आपल्या चाहत्यांसोबत बसमध्ये बसून ऐतिहासिक विजय साजरा केला. अर्जेंटिनाच्या रस्त्यावर चाहत्यांचा महापूर आला होता. दुसरीकडे, राजधानी ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर 40 लाखांहून अधिक लोक आपल्या चॅम्पियन खेळाडूंच्या स्वागतासाठी उतरले होते. इथे जमिनीवर पाय ठेवायलाही जागा नव्हती.
मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक चाहता आतुर झाला होता. त्याचबरोबर ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार चाहत्यांची क्रेझ इतकी होती की, मेस्सीला हेलिकॉप्टरच्या मदतीने बसमधून बाहेर काढण्यात आलं.
झालं असं की, ज्या बसमधून मेस्सी आला होता, त्या बसला चाहत्यांनी घेरलं होतं. हे पथक बसमधून पुलावरून जात असताना काही चाहत्यांनी त्यावर उड्या मारून बसकडे जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बसमधून एक-दोन फॅन्स खाली पडले.
अशा परिस्थितीत चाहत्यांची मर्यादा ओलांडू लागल्यावर प्रशासनाने मेस्सीला बसमधून हटवण्याचा निर्णय घेतला. हा धोका ओळखून प्रशासनाने हेलिकॉप्टरची मदत घेऊन मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांना बसमधून बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी नेले.
फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटमध्ये फ्रान्सला पराभूत करत अर्जेंटिनाने विजेतेपद मिळवण्यात यश मिळवले.
निर्धारित वेळेनंतर सामना 2-2 असा बरोबरीत सुटला, तर 30 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेनंतरही ही धावसंख्या 3-3 अशी बरोबरीत होती, त्यानंतर निकालासाठी शूट आऊटचा आधार घेण्यात आला.
अखेर तिसऱ्यांदा वर्ल्डकपचे जेतेपद पटकावण्यात अर्जेंटिनाला यश आले आहे. याआधी अर्जेंटिनाला 1978 आणि 1986 मध्ये विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यात यश आलं होतं.
Lionel Messi the ? trying to get home. pic.twitter.com/4N98EvrodT
— Frank Khalid (@FrankKhalidUK) December 21, 2022