­ऐकावं ते नवलच ! ओडिशात 63 कोंबड्यांना हार्ट अटॅक, लग्नाची वरात, मृत्यू दारात, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

आता पुढे जे काय होईल ते कायद्यानं पण आपल्याकडेही लग्नसराई सुरु झालीय. डीजेला तशी बंदी आहे. पण हॉस्पिटल आणि इतर संवेदनशिल ठिकाणी मोठा आवाज करण्यापुर्वी ही बातमी नक्की लक्षात ठेवा. कारण आपला आनंद साजरा करण्याची अमर्यादा कुणाचं तरी आयुष्य कायमचं संपवू शकतं.

­ऐकावं ते नवलच ! ओडिशात 63 कोंबड्यांना हार्ट अटॅक, लग्नाची वरात, मृत्यू दारात, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
ओडिशात 63 चिकन्सना हार्ट अटॅक, वरातीच्या म्युझिकचा झटका (सांकेतिक फोटो)
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 8:42 AM

माणसांना हार्ट अटॅक येतो हे आपण रोज ऐकतो, पहातो, वाचतो पण कोंबड्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा मृत्यूही झाला हे रोज तरी ऐकायला मिळत नाही. अर्थातच काही प्राण्यांना, पक्षांना ह्रदयविकाराचा झटका येतो आणि त्यात त्यांचा मृत्यूही ओढावू शकतो हेही आपण पाहिलं, वाचलं असणार. पण चिकनलाही तसा झटका येतो ही थोडी दुर्मिळ घटना. बरं त्यातही एक नाही, दोन नाही तर जवळपास पोल्ट्री फार्ममधला कोंबड्यांचा अख्खा खुराडाच हार्ट अटॅकनं मृत्यूमुखी पडला तर? होय, ही अविश्वसनीय बातमी आहे ओडिशातल्या बालासोरची. इथल्या एका पोल्ट्री फॉर्मवर 63 कोंबड्या हार्ट अटॅकनं मेल्याचं उघड झालंय. तेही सर्वच्या सर्व कोंबड्यांना एकदाच हार्ट अटॅक आला आणि त्यात त्या दगावल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. पण मग दुसरा प्रश्न असाही पडतो की, सर्व कोंबड्यांना एकाच वेळेस हार्ट अटॅक कसा आला. तर त्याचं उत्तर आहे, पोल्ट्री फार्मच्या दारातून गेलेली लग्नाची वरात.

नेमकं काय घडलंय? ओडिशातलं एक महत्वाचं शहर आहे बालासोर. याच शहरात रविवारी एक वरात निघाली. आता वरात म्हटल्यावर बँड बाजा आलाच. त्यातही डीजे वगैरे असेल तर मग आवाजाला काही मर्यादाच नाही. झालंही तसच. बालासोरमध्ये रणजितकुमार परीदा यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यात दोनएकशे कोंबड्या होत्या. वरात वाजत गाजत, मोठ्या दणक्या आवाजात, पोल्ट्री फार्मच्या जवळ आली. खुराड्यातले चिकन बिथरले. डीजेच्या आवाजनं काही चिकन्सची फडफड व्हायला लागली. काही सैरभैर झाली. आवाज करायला लागली. जाग्यावर जीव देतात की काय अशी पाखरांची अवस्था? फार्म मालक पिरादा हे वरातीवाल्यांकडे गेले. त्यांनी पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांची काय अवस्था आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण ना नवरा, ना वरातवाले, कुणीही त्यांचं ऐकण्याच्या मन;स्थितीत नव्हते. उलट वरातीवाल्यांनी डीजेचा आवाज आणखी वाढवला. एवढच नाही तर सहज निघून जाणारी वरात तिथंच थांबली. डीजेच्या मोठ्या आवाज जवळपास पंधरा मिनिटं दंगा मस्ती झाली. वरात ऐकत नाही म्हटल्यानंतर पिरादा परत पोल्ट्री फार्मवर आले तर काही कोंबड्यांनी मान टाकलेली होती. काही मरुन पडले होते. काही रुंगले होते. डीजेच्या आवाजानं पोल्ट्री फार्मवर मृत्यूचं तांडव आलं होतं. बघता बघता 63 कोंबड्या पंधरा मिनिटाच्या आत दगावल्या.

डॉक्टर काय म्हणाले? डीजेच्या आवाजानं कोंबड्या दगावतील यावर फार्म मालकाला विश्वासच बसत नव्हता. पण त्याच्यासमोर मेलेल्या कोंबड्यांचा खच पडला होता. मालकाचा तरीही विश्वास बसतच नव्हता. त्याला वाटलं कुठला तरी रोग पडला आणि त्यात कोंबड्यांना मर लागली असावी. त्यात ते दगावले. ज्यानं कुणी ऐकलं त्यांचाही डीजेच्या संगीतानं पक्षांचा असा मृत्यू होईल यावर विश्वास बसत नव्हता. शेवटी पोल्ट्री मालकानं व्हेटरनरी डॉक्टरला पाचारण केलं. त्यांनी मेलेल्या कोंबड्यांची तपासणी केली आणि शेवटी ह्या 63 कोंबड्यांचा मृत्यू हा हार्ट अटॅकनेच झाल्याचा रिपोर्ट दिला. डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर मात्र मालक पिरादा यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि वरातीवाल्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता पुढे जे काय होईल ते कायद्यानं पण आपल्याकडेही लग्नसराई सुरु झालीय. डीजेला तशी बंदी आहे. पण हॉस्पिटल आणि इतर संवेदनशिल ठिकाणी मोठा आवाज करण्यापुर्वी ही बातमी नक्की लक्षात ठेवा. कारण आपला आनंद साजरा करण्याची अमर्यादा कुणाचं तरी आयुष्य कायमचं संपवू शकतं.

हे सुद्धा वाचा :

Weight Loss : झटपट वजन कमी करायचे? मग रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा!

इंजिनिअरिंगला अच्छे दिन, प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली, नेमकं कारण काय?

Zodiac Capricorn | मकर राशीच्या व्यक्तींना या 5 गोष्टी चूकुनही विचारु नका, नाहीतर मैत्री संपली समजा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.