मगरींना धोकादायक मानले जाते आणि त्या कधीही आपल्यावर हल्ला करू शकतात आणि आश्चर्यचकित करू शकतात. त्यामुळे लोक मगरींपासून नेहमीच लांब असतात, मगरींना घाबरून असतात. या मगरी आपल्या संभाव्य शिकारीवर हल्ला करण्यास वेळ घेत नाहीत, कारण ते एका झटक्यात हल्ला करू शकतात. पण एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एक लहान मूल मगरीला चक्क पाठीवर घेऊन चाललाय. हे दृश्य बघून अंगावर काटा येतो.
चिमुरडा मगरीला पाठीवर घेऊन निर्भयपणे रस्त्यावरून चालत आहे. गेल्या महिन्यात 16 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आलेली ही क्लिप डिलीट करण्यात आली आहे. ‘मगरीचा आत्मसन्मान लगेच चव्हाट्यावर आला असावा,’ असे कॅप्शन या व्हिडिओसोबत देण्यात आले आहे, ज्यात एक मुलगा मगरीला आपल्या पाठीवर घेऊन जाताना दिसत आहे. लहान मुलाने हाताने मगरीचे पुढचे पाय पकडून आपल्या खांद्याजवळ गुंडाळून घेतलेत, तर बाकीची मगर मागच्या बाजूला लटकलेली दिसली.
harga diri si buaya langsung turun pic.twitter.com/xl3z1tlpHR
— ?????? ????? ?? ???????? (@FunnyVideosID) February 16, 2023
मुलाचे हे निर्भीड कृत्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले. काहींनी तर या घटनेचे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगही केले. व्हिडिओमध्ये त्या ठिकाणाचा उल्लेख नसला तरी ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ काढण्यात आला आहे, त्यावरून इथे मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असावी असं दिसून येत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या इन्शुलेटेड फिश कंटेनरही बारकाईने पाहिल्यास दिसतात. नेटकऱ्यांनीही या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “मगर थकली आहे.” आणखी एक जण म्हणाला, “मगरीला एक चांगला मित्र मिळाला.”