Little child viral video : Alexaनं गाणं ऐकवल्यानंतर किती सुंदर डान्स करतोय ‘हा’ चिमुकला

Kid cute video : मुलांचे असे अनेक गोंडस क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)होत असतात, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. एका व्हिडिओमध्ये लहान मूल अॅलेक्सा(Alexa)ला गाण्याची विनंती करते आणि जेव्हा ते ऐकवले जाते तेव्हा तो आनंदाने नाचू लागतो.

Little child viral video : Alexaनं गाणं ऐकवल्यानंतर किती सुंदर डान्स करतोय 'हा' चिमुकला
अॅलेक्सानं गाणं ऐकवल्यानंतर डान्स करताना चिमुकला
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 12:30 PM

Kid cute video : मुलांचे असे अनेक गोंडस (Cute) क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल (Viral)होत असतात, जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. मात्र, मुलांशी संबंधित काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडतो की, इतक्या लहान वयात हे असं कसं करत असतील? याच प्रकारातला इंटरनेटवर एका लहान मुलाचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मूल अॅलेक्सा(Alexa)ला गाण्याची विनंती करते आणि जेव्हा ते ऐकवले जाते तेव्हा तो आनंदाने नाचू लागतो. व्हिडिओतील मुलाचे भाव पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. मुलं ही अतिशय निष्पाप आणि गोड असतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये त्यांचा निरागसपणा नक्कीच दिसला असेल. मुलांचा हा स्वभाव लोकांची मने जिंकतो. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओही तेच दर्शवतो.

इन्स्टावर शेअर

व्हिडिओमध्ये अॅलेक्सासमोर एक लहान मूल उभे आहे. यानंतर तो म्हणतो, की अलेक्सा, हे गाणे वाजवा. सुरुवातीला अलेक्साला त्याचा आवाज समजत आला नाही. यानंतर मूल पुन्हा विनंती करतो. यावेळी ते मुलाचे गाणे वाजवते. मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटेल. हा अतिशय गोंडस व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर डर्टीहेड्स नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी अपलोड झालेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. यूझर्स या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत. आतापर्यंत 2 लाख 35 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. त्याचवेळी अनेक यूझर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘क्यूट मुलगा’

एका यूझरने कमेंट करत लिहिले, की अरे देवा… खूपच क्यूट आहे.’ त्याचवेळी आणखी एका यूझरने म्हटले, की या व्हिडिओने त्याचा दिवस बनवला आहे. आणखी एका यूझरने कमेंट करत लिहिले, की गाणे वाजल्यानंतर मुलाने दिलेल्या प्रतिक्रियेने माझे मन जिंकले आहे.’ एकूणच हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dirty Heads (@dirtyheads)

आणखी वाचा :

पेरू खाण्याचं ‘हे’ अजब चॅलेंज स्वीकारणार का? पाहा ‘हा’ Viral झालेला Funny Video

Viral : ‘हा’ फोटो काढायला लागली तब्बल दोन वर्ष! यूझर्स म्हणतायत, ‘फोटोग्राफरच्या शानदार समर्पणाला सलाम..’

Ranveer Singhनं शेअर केला ‘Chhoti Deepika’चा Video, हावभाव पाहुन तुम्हीही कराल कौतुक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.