सांगा आता हिला गणपती बाप्पाचं रेनकोट कुठाय? Viral Video
गणपती बाप्पाच्या आगमनावेळी सुद्धा लहान मुलांइतकं उत्सुक कुणीच नसतं. बाप्पा बाप्पा करत लहान मुलं साऱ्या घरभर फिरत असतात. मग त्यांचे प्रश्न पण मजेशीर असतात. बाप्पा काय खातो? उंदीरमामा बाप्पाचा कोण? बाप्पा कुठे राहतो...वगैरे वगैरे. प्रश्न विचारून लहान मुलं भंडावून सोडतात.
मुंबई: लहान मुलांचं आणि गणपतीचं एक अनोखं नातं असतं. तुम्ही पाहिलंच असेल की लहान मुलांची गणपती बाप्पाशी संबंधित अनेक चित्रपट आहेत गाणे आहेत. काही गाणी तर लहान मुलांनी स्वतः गायलेली आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनावेळी सुद्धा लहान मुलांइतकं उत्सुक कुणीच नसतं. बाप्पा बाप्पा करत लहान मुलं साऱ्या घरभर फिरत असतात. मग त्यांचे प्रश्न पण मजेशीर असतात. बाप्पा काय खातो? उंदीरमामा बाप्पाचा कोण? बाप्पा कुठे राहतो…वगैरे वगैरे. प्रश्न विचारून लहान मुलं भंडावून सोडतात.
एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. एक लहान मुलगी उद्यानात जाते. आई वडिलांसोबत तिथे गेल्यावर तिला त्या उद्यानात गणपती बाप्पाची मोठी मूर्ती दिसते. ती मूर्ती पावसात भिजत असते. मुलीने पाऊस पडतोय म्हणून रेनकोट घातलेला असतो. मुलगी बाप्पाला बघते आणि हात जोडते. बाप्पाकडे बघताना तिच्या लक्षात येतं, अरे बाप्पाने तर रेनकोट घातलेलाच नाहीये. मग ती विचारते बाप्पाने रेनकोट का नाही घातला? यावर तिचे पालक शांत बसतात आणि त्यांना काय उत्तर द्यावं हे कळत नाही. ते तिला विचलित करायचा प्रयत्न करतात.
Tiny Devotee, Big Question!
A kid enquiring about Ganpati Bappa’s raincoat ?? pic.twitter.com/kIzfQ3DWxP
— Godman Chikna (@Madan_Chikna) July 6, 2023
खरं तर तिचा प्रश्न अगदी निरागस असतो, खरा असतो. मूर्ती भिजत असते तिच्या लक्षात येतं आपण भिजू नये म्हणून आपण रेनकोट घालतोय तसाच गणपती बाप्पाच्या मूर्तीला का बरं रेनकोट घालायला देत नाहीत? हा व्हिडीओ बघून अनेकजण आपलं हसू थांबवू शकले नाही. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ बघून प्रचंड हसाल. ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला आतापर्यंत 120 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 2236 लाइक्स मिळाले आहेत. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओ क्लिपने अनेक नेटकऱ्यांचं मन जिंकलंय.