Vidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले

या व्हिडीओमध्ये छोटी मुलगी अतिशय मनमोहक डान्स करत आहे. मुलीच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Vidral | लाँग स्कर्ट-चोळी घालून छोट्या मुलीचा गोड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले
girl dance video
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 4:43 PM

मुंबई : सोशल मीडियाचं विश्व मोठं मजेदार आहे. या मंचावर कधी कशाची चर्चा होईल हे सांगता येत नाही. सध्या तर एका छोट्या मुलीचा मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये छोटी मुलगी अतिशय मनमोहक डान्स करत आहे. मुलीच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (little girl dancing on punjabi rajasthani song video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी दिसत आहे. या मुलीने गोड मोकअप केला असून ती अतिशय छान दिसत आहे. लाँग स्कर्ट आणि पिवळ्या रंगाची चोळी घातलेली ही मुलगी अतिशय गोड डान्स करत आहे. तिचा डान्स पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

पंजाबी-राजास्थानी गाण्यावर मुलीचा मजेदार डान्स

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलीचे नाव ईशान्वी हेगडे असे आहे. ही मुलगी तिच्या आईसोबत वेगवेगळ्या गाण्यांवर मजेदार डान्स करत असते. यापूर्वीसुद्धा तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. मात्र, सध्याच्या व्हिडीओमध्ये लाँग स्कर्ट आणि चोळी घालून पंजाबी आणि राजस्थानी संस्कृतीची झालर असलेल्या गाण्यावर ईशान्वी थिरकत आहे. म्हणूनच नेटकऱ्यांना तिचा हा डान्स विशेष रुपाने आवडत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी ही मुलगी अतिशय छान डान्स करत असल्याची कमेंट केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी ही मुलगी भविष्यात चांगली डान्सर होणार असे भाकीत वर्तविले आहे. व्हायरल होणारा हा व्हिडीओ nivedithashetty या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | नवरदेव वरात घेऊन आला, नवरीने केलं भलतंच काही, मजेदार व्हिडीओ पाहाच

Viral Video : डान्सिंग आजीचा सोशल मीडियावर थाट, 78 वर्षीय कृष्णकुमारी तिवारीचा हा व्हिडीओ नक्की बघा…

Video | त्याला रुग्णवाहिकेतून बाहेर काढलं, काही क्षणात स्ट्रेचरवरुन उठला अन् पळायला लागला, व्हिडीओ व्हायरल

(little girl dancing on punjabi rajasthani song video went viral on social media)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.